IMPIMP

Bhagat Singh Koshyari | वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यपालांचा दिल्ली दौरा

by nagesh
Bhagat Singh Koshyari| who is the new governor after the resignation of bhagat singh koshyari

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  – गेले तीन दिवस राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्यावर राज्यातील भाजपेत्तर पक्ष टीका करत आहेत. औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आक्षेपार्ह भाष्य केले होते. त्यामुळे ते सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. आता भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचा दिल्ली दौरा नियोजित आहे. त्यामुळे महाराष्ट्रात चर्चांना उधान आले आहे.

राज्यापालांचा 24 आणि 25 नोव्हेंबर असा नियोजित दिल्ली दौरा आहे. त्यामुळे भाजपचे वरिष्ठ नेते दिल्लीत राज्यपालांची कानउघाडणी करणार का, यावर राज्यात चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षांनी राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यामुळे राज्यपालांचा हा दिल्ली दौरा महत्वाचा ठरणार आहे. गेले अनेक दिवस राज्यपालांचे दिल्ली दौरे वाढले आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दीक्षांत समारंभात शिवाजी महाराजांवर वादग्रस्त वक्तव्य केले होते.
शिवाजी महाराज आता जुन्या काळातील नायक झाले असून, आता देशात नवीन नायक आहेत.
त्यात डॉ. आंबेडकरांपासून, नितीन गडकरी, शरद पवार आदी नवीन नायक तयार झाले आहेत.
असे राज्यपाल म्हणाले होते. तसेच भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी देखील शिवाजी महाराजांबद्दल
आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यामुळे या दोघांच्या विरोधात जनतेमध्ये प्रचंड रोष आहे.
त्यामुळे या दोघांवर देखील भाजपने कारवाई करावी, अशी मागणी जोर धरते आहे.

Web Title :- Bhagat Singh Koshyari | maharashtra politics governor bhagat singh koshyari visit to delhi after controversial statement political discussions

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | समाजसेवा करतो म्हणून कोयत्याने सपासप वार करुन पत्नीचा केला विनयभंग; वाकड परिसरातील घटना

MLA Pratap Sarnaik | ‘एकनाथ शिंदे यांनी मला 900 खोके दिले, पण…’; बाळासाहेबांची शिवसेनेतील आमदार प्रताप सरनाईक यांचा उद्धव ठाकरे गटाला टोला

MLA Bhaskar Jadhav | भास्कर जाधवांना पुणे न्यायालयाकडून दिलासा; अटकपूर्व जामीन मंजूर

Related Posts