IMPIMP

Big B Amitabh Bachchan | अमिताभ बच्चन यांनी मागितली माफी; जाणून घ्या प्रकरण

by nagesh
 Superstar amitabh bachchan health update

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन (Big B Amitabh Bachchan) यांचे हिंदी भाषेवर चांगलेच प्रभुत्त्व आहे. एखादा शो असो किंवा मुलाखत ते नेहमीच हिंदीतून संवाद साधत असतात. सध्या त्यांचा सुरु असलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ (kon banega karodpati) या शोमध्ये ते स्पर्धकांना प्रोत्साहित करण्याबरोबरच त्या वडिल हरिवंशराय बच्चन (harivanshrai bacchan) यांच्या कविता देखील ऐकवत असतात. नुकतीच अशी एक घटना घडली आहे की, त्यावरून बिग बी यांनी माफी देखील मागितली आहे. बिग बी यांनी हिंदीमध्ये शेअर केलेल्या पोस्टमध्ये एक चूक झाली होती. ती चूक पटनातील तरुणाने त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्याबद्दल त्यांनी माफी देखील मागितली. दरम्यान, या तरुणाचं आणि बिग बी (Big B Amitabh Bachchan) यांच्यात झालेल चॅट चांगलच व्हायरल होत आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

दसऱ्यानिमित्त बिग बी यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामध्ये त्यांनी ‘दशहरा’ लिहिण्याएवजी ‘दशहेरा’ लिहिलं होतं. ज्यावेळी पटनातील तरुण राजेश पांडेने (Rajesh Pandey) हि पोस्ट पाहिली त्यावेळी त्याने बिग बींनी केलेल्या पोस्टवर कमेंट करत त्यांची चूक लक्षात आणून दिली. कमेंटमध्ये त्याने ‘दशहरा’ आणि ‘पेशेवर’ हे दोन शब्द अशुद्ध लिहिले असल्याचं त्याने सांगितलं. राजेशने यावेळी बिग बी (Big B Amitabh Bachchan) यांच्या एका जुन्या सिनेमातील डायलॉगमध्ये देखील चूक होती हे देखील निदर्शनास आणून दिलं. बिग बींनी खुदा गवाह या सिनेमात ‘पेशेवर मुजरिम’ म्हणण्याऐवजी पेशावर मुजरिम असं म्हंटलं होतं. यानंतर या तरुणीच्या कमेंटला बिग बी यांनी उत्तर दिले. त्यांनी झालेल्या चुकीबद्दल माफी मागितलीच पण यापुढे चूक सुधारणार असल्याचं म्हंटलंय. तसेच या तरुणाचे चूक लक्षात आणून दिल्याबद्दल आभार देखील त्यांनी मानले आहेत.

Web Title :- Big B Amitabh Bachchan | big b amitabh bachchan apologize for mistake in dasara post

हे देखील वाचा :

Pune News | ‘जे मिळेल त्यामध्ये खूष’ राहाणार्‍या रिपाइंची ‘महापौर’ पदाची मागणी केवळ दबावतंत्राचा भाग!

Gold Price Today | दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरात वाढीचे सत्र सुरू, चांदीही महागली, जाणून घ्या आजचे नवीन दर

National Pension Scheme | NPS मध्ये मिळतात 3 प्रकारचे इन्कम टॅक्स बेनिफिट, जाणून घ्या कशाप्रकारे देतात फायदा

Related Posts