IMPIMP

Maharashtra Politics Palghar Shivsena | उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का ! पालघर जिल्ह्यातील खासदार-आमदारासह जिल्हाप्रमुख शिंदे गटात

by nagesh
Maharashtra Politics | yuva sena sharad koli slams eknath shinde group and election commission over shivsena party symbol clashes

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Politics Palghar Shivsena | गेल्या काही दिवासापासून राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या राजीनाम्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) स्थापन झालं. त्यानंतर शिवसेनेला धक्कातंत्र सहन करावं लागत आहे. पालघरमध्ये (Palghar) देखील शिवसेनेला (Maharashtra Politics Palghar Shivsena) मोठा धक्का बसला आहे. हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे. कारण शिवसेनेच्या मोठ्या गटाने शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. येथील खासदार, आमदारासह जिल्हाप्रमुख शिंदे गटात सामिल झाले आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

जिल्ह्यातील बहुतांश नगरसेवक, जिल्हापरिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य शिंदे गटात सामील झाले आहेत. अशातच आता पालघर जिल्ह्यात शिवसेनेत मोठी फूट पडली असून खासदार आमदारांसह जिल्हाप्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटात मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. जिल्ह्यात शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी बाहेर पडल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. (Maharashtra Politics Palghar Shivsena)

खासदार राजेंद्र गावित (MP Rajendra Gavit), आमदार श्रीनिवास वनगा (MLA Srinivas Vanga),
जिल्हाप्रमुख राजेश शहा (Rajesh Shah), जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम (Prakash Nikam)
यांच्यासह जिल्ह्यातील काही नगर पंचायतीचे नगरसेवक, पंचायत समिती सभापती,
सदस्य आणि प्रमुख कार्यकर्ते शिंदे गटात आता सहभागी होणार आहेत. हे पाहता शिंदे गटाचे पारडे आणखी जड होण्याच्या मार्गावर आहे.

Web Title :- big blow to shiv sena and uddhav thackeray in palghar mp mla along with shivsena district chief in the eknath shinde group

हे देखील वाचा :

Gopichand Padalkar On Jayant Patil | ‘जयंत पाटलांच्या चेहऱ्यावर सत्ता गेल्याचं सुतक’ – गोपीचंद पडळकर

Supreme Court On Rape Case | ‘संबंध’ बिघडल्यावर महिला पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल करु शकत नाही – सुप्रीम कोर्ट

Maharashtra Rains Update | राज्यात सर्वत्र ‘धो-धो’; अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत

Related Posts