IMPIMP

Big Changes From June | 1 जूनपासून लागू होतील ‘हे’ 5 मोठे बदल, तुमच्या खिशावर होईल थेट परिणाम; जाणून घ्या

by Team Deccan Express
Big Changes From June | these 5 big changes will be implemented from june 1 will have a direct impact on your pocket

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Big Changes From June | 1 जूनपासून असे 5 मोठे बदल होणार आहेत ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होऊ शकतो. नवीन महिन्यासह काही आर्थिक बदल देखील होणार आहेत. यामध्ये एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत (LPG Gas Cylinder Price) बदल, बँक बचत (Saving Bank Account) आणि एफडी खात्यावरील व्याजदर (Interest On Fixed Deposit) यांचा समावेश असू शकतो. (Big Changes From June)

1 जूनपासून असेच पाच बदल होणार आहेत. यामध्ये गोल्ड हॉलमार्किंग (Gold Hallmarking) , एसबीआय गृह कर्ज (SBI Home Loan), अ‍ॅक्सिस बँक बचत खाते नियम (Axis Bank Saving Account Rule), मोटार विमा प्रीमियम (Vehicle Insurance Premium) आणि एलपीजी गॅस सिलिंडरची अपेक्षित किंमत समाविष्ट आहे. या सर्व मुद्यांवर आम्ही एक एक करून तपशीलवार माहिती देऊ.

1. एसबीआय गृहकर्ज

तुम्ही एसबीआयकडून गृहकर्ज घेतले असेल, तर 1 जूनपासून तुमच्या खिशावर अतिरिक्त व्याजदराचा भार पडणार आहे. त्याच वेळी, जर तुम्ही बँकेकडून नवीन कर्ज घेणार असाल, तर व्याजदर बदलले आहेत हे लक्षात ठेवा आणि त्यानुसार घर घेण्यासाठी तुमची बँक निवडा. एसबीआयने एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट 40 बेस पॉइंट्स किंवा 0.40 टक्के वाढ केली आहे. आता तो 7.05 टक्के झाला आहे. (Big Changes From June)

2. वाहन विमा प्रीमियम

तुमचा वाहन विम्याचा हप्ता आता महाग होणार आहे. रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एक अधिसूचना जारी केली आहे की 1000 सीसी इंजिन क्षमतेच्या कारसाठी विमा प्रीमियम आता 2,094 रुपये असेल, जो कोविड – 19 महामारीपूर्वी 2,072 रुपये होता. याशिवाय 1,000 सीसी ते 1500 सीसी इंजिन असलेल्या कारसाठी विमा प्रीमियम 3221 रुपयांवरून 3416 रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे.

3. गोल्ड हॉलमार्किंगचा दुसरा टप्पा

सोन्याच्या हॉलमार्किंगचा दुसरा टप्पा 1 जूनपासून सुरू होणार आहे. आता 32 नवीन जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग केंद्र उघडण्यात येणार आहेत. यापूर्वी 256 जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग केंद्रे होती. आता एकूण 288 जिल्ह्यांमध्ये केवळ 20 ते 24 कॅरेटचे हॉलमार्क केलेले सोने विकले जाईल.

4. अ‍ॅक्सिस बँक बचत खाते

अ‍ॅक्सिस बँकेने बचत खात्यांच्या सेवेवरील शुल्कात वाढ केली आहे. हेही 1 जूनपासून लागू होणार आहे.
यामध्ये बचत खात्याच्या देखरेखीसाठी आकारले जाणारे सेवा शुल्क देखील समाविष्ट आहे.
यासोबतच अतिरिक्त चेकबुकचे शुल्कही आकारण्यात येणार आहे.

5. गॅस सिलेंडरची किंमत

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलिंडरच्या किमती ठरवल्या जातात.
आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किमती वाढल्याच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत बाजारातही गॅसच्या किमती वाढण्याची अपेक्षा आहे.
अलीकडेच घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 3.50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती.

Web Title :- Big Changes From June | these 5 big changes will be implemented from june 1 will have a direct impact on your pocket

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हे देखील वाचा :

Related Posts