IMPIMP

Kirit Somaiya On Shivsena MP Sanjay Raut | किरीट सोमय्यांचं सूचक ‘Tweet’; म्हणाले – ‘अब संजय राऊत की बारी’

by nagesh
Sanjay Raut | shivsena mp sanjay raut on bjp kirit somaiya gets clean chit from mumbai police

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  Kirit Somaiya On Shivsena MP Sanjay Raut | महाविकास आघाडीचे सरकार (MVA Government) होते त्यावेळी भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर गंभीर आरोपांचा सपाटा लावला होता. अनेक मंत्री, विशेष म्हणजे शिवसेना नेते त्यांच्या रडारवर होते. अनिल परब (Anil Parab), प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik), भावना गवळी (Bhavana Gawli), माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर देखील कारवाई करण्याची मागणी सोमय्या करत होते. यानंतर आता किरीट सोमय्यांनी एक नवं ट्वीट केलं आहे. (Kirit Somaiya On Shivsena MP Sanjay Raut)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

किरीट सोमय्या यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे आणि आरोपांमुळे अनेक शिवसेना तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांना चौकशीला सामोरे जावे लागले. तसेच संजय राऊत यांचीही चौकशी झाली आहे. दरम्यान राऊत यांना ईडीकडून (ED) पुन्हा समन्स बजावण्यात आले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहेत. अशातच आता किरीट सोमय्यांनी एक सूचक ट्वीट केलं आहे. “आता संजय राऊतांची पाळी आहे,” असं सोमय्या यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, गोरेगाव पत्राचाळ जमीन घोटाळ्या (Goregaon Patra Chawl Land Scams) विषयी सोमय्या यांनी पाठपुरावा केला होता.
याआधी ही सोमय्या यांनी अनिल देशमुख (Anil Deshmukh), नवाब मलिक (Nawab Malik) तसेच
अनिल परब (Anil Parab) यांना चौकशीला सामोरे जावे लागलं आहे आणि आता संजय राऊत यांना देखील
चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे असं ट्विट सोमय्या यांनी केलं आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- bjp leader kirit somaiya on shivsena mp and leader sanjay raut about ed

हे देखील वाचा :

ED Summons To Shivsena MP Sanjay Raut | शिवसेना खासदार संजय राऊतांना ‘ईडी’कडून पुन्हा समन्स

Shivsena MP Sanjay Raut | “संसार में सबसे आसान काम अपनेको धोखा देना हैं” – संजय राऊतांचं ट्वीट

Mumbai-Pune Pragati Express | प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! मुंबई-पुणे प्रगती एक्स्प्रेस व्हिस्टाडोम कोचसह धावणार

Related Posts