IMPIMP

BJP MLA Ashish Shelar | उद्धव ठाकरेंच्या आव्हानाला भाजप आमदार आशिष शेलारांचे जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले – ‘मर्दाची शिवसेना असेल तर सुपुत्राला…’

by nagesh
Ashish Shelar | bjp ashish shelar slams shivsena aaditya thackeray over vedanta foxconn project

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांची काल गोरेगावमध्ये सभा झाली.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी मर्द असाल आणि हिम्मत असेल तर मुंबई पालिकेची निवडणूक (Mumbai Municipal Corporation Election)
महिनाभरात घेऊन दाखवा, असे आव्हान केले होते. ठाकरेंच्या आव्हानाला भाजप आमदार आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांनी जोरदार
प्रत्युत्तर दिलं आहे. तुमचे सुपुत्र आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आमच्या मतांवर वरळीचा आमदार म्हणून निवडून आला आहे. त्यामुळे शिवसेना
मर्दांची असेल तर अगोदर पेंग्विन सेना (Penguin Army) प्रमुखाला राजीनामा द्यायला सांगा, असा पलटवार आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांनी ठाकरेंवर केला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

उद्धव ठाकरे यांच्या कालच्या भाषणावर आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. आमच्या जीवावर निवडून यायचं. दुसऱ्यासोबत सरकार बनवायचं आणि ते पडलं की विद्यमान सरकार बरखास्त करुन दाखवा म्हणून आव्हान द्यायचं, ही पाटलीनीची भाषा योग्य नाही. आव्हान द्यायचंच असेल तर लुकड्या तुकड्या महाविकास आघाडीबरोबर (Mahavikas Aghadi) जाऊन आमच्याविरोधात निवडणूक लढा आणि आमच्याशी दोन हात करा, अशा शब्दात शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

उद्धव ठाकरे यांनी आशिष शेलार यांच्यावर टीका करताना शेलारमामाचं उदाहरण दिलं.
यावर बोलताना आशिष शेलार म्हणाले, मी शेलार मामांच्या कुळातील, वंशातील आहे, याचा मला अभिमान आहे.
महाराजांनी जे जे काम सांगितलं ते शेलारमामांनी इमाने इतबारे केलं.
ते कधी घरात बसले नाहीत. पण आमच्यावर टीका करणारे कधी घराबाहेर पडले नाहीत.
इतिहास असा सांगतो की जे घरात बसले त्यांना जनतेने कायमचं घरी बसवलं, असा टोला आशिष शेलार यांनी लगावला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- BJP MLA Ashish Shelar | bjp president ashish shelar answer to shivsena uddhav thackeray goregaon nesco maidan sabha

हे देखील वाचा :

Building slab collapses in Ulhasnagar | उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून 4 जणांचा मृत्यू

Health Tips | रोज सकाळी पोट होत नसेल स्वच्छ, अवलंबा ‘हे’ 8 उपाय, पोटात जमा झालेली घाण होईल दूर

MNS On Uddhav Thackeray | मनसेची उद्धव ठाकरे यांच्यावर बेताल टीका, म्हणाले – ‘बाळासाहेबांच्या पुण्याईवर जगणारे बांडगुळ…’

Related Posts