IMPIMP

BJP MLA Atul Bhatkhalkar | ‘सरकारी वकिलांच्या वक्तव्यावरून परमबीर सिंह आणि शिवसेनेचं साटंलोटं असल्याचं सिद्ध, चौकशी CBI कडे सोपवा’

by nagesh
BJP MLA Atul Bhatkhalkar | link between shiv sena and mumbai former cp parambir singh bjp mla atul bhatkhalkars demand handover probe towards cbi

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन BJP MLA Atul Bhatkhalkar | मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) मागील अनेक दिवसांपासून बेपत्ता होते. इतक्या दिवसानंतर परमबीर हे आज मुंबईत दाखल झाले आहेत. त्यानंतर त्यांची अधिक वेळ चौकशी देखील करण्यात आलीय. दरम्यान, ‘परमबीर यांच्याविरोधात राज्य शासनाने दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या तपासासाठी राज्याचे पोलिस अधिकारीच मदत करत नसल्याचे स्वतः सरकारी वकिलांनी कोर्टात (court) सांगितले. म्हणून पहिल्या दिवसापासून परमबीर आणि शिवसेनेचं (Shiv Sena) साटंलोटं असल्याचा आपला आरोप सरकारी वकिलांच्या विधानावरुन सिध्द झाला असल्याचं’ भाजपचे आमदार अतुल भातखळकर (BJP MLA Atul Bhatkhalkar) यांनी म्हटलंय.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

काय म्हणाले भातखळकर?
परमबीर सिंह (Parambir Singh) यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यांची गंभीरता लक्षात घेता त्याची निःपक्ष चौकशी व्हावी याकरिता तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) द्यावा अशी मागणी आमदार भातखळकर (BJP MLA Atul Bhatkhalkar) यांनी केली आहे. त्यावेळी भातखळकर म्हणाले की, ‘परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर आरोप केल्यानंतर तब्बल 261 दिवस फरार असताना सुद्धा त्यांना बडतर्फ करण्याची शिफारस मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे का केली नाही? त्यांना होमगार्ड महासंचालक या पदावरून हटवण्याची कारवाई राज्य सरकारने (Maharashtra Government) का केली नाही?,’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

तसेच, ‘परमबीर सिंह यांच्यावर एवढे गंभीर गुन्हे दाखल असताना त्यांना शोधण्यासाठी विशेष पथक का स्थापन केले नाही? या बाबतीत केंद्र सरकार किंवा इतर राज्यांची मदत का मागितली नाही? याचे कारण म्हणजे ‘त्या अनिल वर आरोप केले तर केले, पण आमच्या अनिल वर कोणतेही आरोप करू नको, मी तुझ्यावर कारवाई करत नाही’, अशा ‘तेरी भी चूप और मेरी भी चूप’ संवादातून शिवसेनेने हे सर्व नाटक चालविले आहे. अशा सर्वा सवालावरुन तपास सीबीआयकडे (CBI) द्यावा,’ अशी मागणी भातखळकर यांनी केलीय.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

दरम्यान, ‘कॉंग्रेसवाल्यांनी (Congress) परमबीर यांना केंद्र सरकारने (Central Government) परदेशी पळून जाण्यात व फरार करण्यात मदत केली
असा खोटा आरोप केला होता, परंतू, परमबीर सिंह हे इतके दिवस भारतातच होते व काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्याच्या राजधानीत चंदिगड मध्ये होते हे आता सिद्ध झालेय.
एकीकडे आपण ज्या पक्षासोबत सत्तेत भागीदार आहोत तोच पक्ष परमबीर सिंह (Parambir Singh) यांना वाचवित होता
हे माहीत असतानाही त्याबद्दल चकार शब्द काढायचे नाही
आणि दुसरीकडे मात्र मोदी द्वेषातून केंद्र सरकारवर नाहक व खोटे आरोप करायचे हा काँग्रेसचा ढोंगीपणा आता उघड झाला आहे.’
अशी टीकाही अतुल भातखळकर यांनी केली आहे.

Web Title :- BJP MLA Atul Bhatkhalkar | link between shiv sena and mumbai former cp parambir singh bjp mla atul bhatkhalkars demand handover probe towards cbi

हे देखील वाचा :

‘ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी’सह 57 kmpl मायलेजची Suzuki Access 125 खरेदी करा अवघे 9 हजार देऊन, इतका होईल EMI

Parambir Singh | परमबीर सिंह मुंबई पोलिसांसमोर हजर ! गुन्हे शाखेकडून 7 तास चौकशी, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त म्हणाले…

Pune Corporation | बकेट, कापडी पिशव्या, बेचेंस खरेदीला शहर कॉंग्रेसकडून विरोध; महापालिकेतील ‘कॉंग्रेस’ची झाली ‘गोची’

Related Posts