IMPIMP

BJP MLA Nitesh Rane | ‘…म्हणून मी आदित्य ठाकरे जात असताना म्याव, म्याव केलं’ – नितेश राणे

by nagesh
BJP MLA Nitesh Rane | bjp mla nitesh rane has criticized shiv sena minister Aditya Thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन BJP MLA Nitesh Rane | महाराष्ट्रातील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचं (maharashtra winter assembly session) सत्र सुरु झालं आहे. काल (बुधवारी) सुरू झालेल्या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपांच्या फैरी झडत असल्याचं दिसलं. दरम्यान आज (गुरुवारी) अधिवेशनाच्या दुस-या दिवशी राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्याबाबत एक व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसिद्ध होत आहे. याबाबत भाजपचे आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी खुलासा केला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) दुसऱ्या दिवशी सभागृहात जात असताना नितेश राणे हे विधानसभेच्या पायऱ्यावर इतर भाजप सदस्यांसमेवत बसले होते. त्या दरम्यान आदित्य ठाकरे पायरी चढून वर जात असतानाच नितेश राणे यांनी त्यांच्याकडे पाहून म्याव, म्याव, असा आवाज काढला. आमदार नितेश राणेंच्या या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियातून समोर आला आहे.

‘हो, मी आदित्य ठाकरे यांना पाहून म्याव, म्याव केलं.’ कारण आधी वाघाची डरकाळी देणाऱ्या शिवसेनेची अवस्थाच म्याव, म्याव सारखी झाली आहे,’
असं नितेश राणे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केली होती.
त्यादरम्यान अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नितेश राणेंनी भास्कर जाधव यांना सोंगाड्या म्हटले आहे.
त्यानतंर, जाधव यांनी बिनशर्त माफी मागितली.
त्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) देखील आक्रमक झाले होते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

Web Title :- BJP MLA Nitesh Rane | bjp mla nitesh rane has criticized shiv sena minister Aditya Thackeray

हे देखील वाचा :

POCSO Court | पोक्सो न्यायालय : विरूद्ध लिंगाचा मित्र असण्याचा अर्थ हा नाही की तो लैंगिक इच्छा पूर्ण करण्यासाठी उपलब्ध आहे

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 52 नवीन रुग्णांचे निदान; जाणून घ्या इतर आकडेवारी

Girls Marriage Age | …म्हणून केंद्र सरकारने घेतला मुलींच्या विवाहाचं वय वाढवण्याचा निर्णय

Related Posts