IMPIMP

BJP MLA Nitesh Rane | ‘आदित्यसेनेला टक्केवारी देणार्‍या बिल्डरांवर कारवाई करा’ – नितेश राणे

by nagesh
BJP MLA Nitesh Rane | BJP MLA nitesh rane letter to dcm devendra fadnavis for mumbai builder and allegation on shiv sena aaditya thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – BJP MLA Nitesh Rane | मनपाच्या निवडणूका (Maharashtra Municipal Elections 2022) जवळ आल्या आहेत आणि पुन्हा सत्ताधारी आदित्यसेनेने (Aaditya Thackeray) मुंबई महाराष्ट्रपासून (Mumbai – Maharashtra) तोडणार आणि मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार करणार अशा उलट्या बोंबा मारण्यास सुरूवात केली आहे. परंतु वास्तविक यांच्या जवळच्याच टक्केवारी मिळवून देणार्‍या विकासकांमुळे मुंबईकर नाईलाजास्तव मुंबईतून हद्दपार झाला आहे. या बिल्डरांवर (Builders In Mumbai) कारवाई करा, अशी मागणी भाजपा आमदार नितेश राणे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे (Nitesh Rane Letter To DCM Devendra Fadnavis).

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

या पत्रात पुढे म्हटले आहे की, पुर्नविकास नियंत्रण नियमावली अंतर्गत भाडेकरू तथा एसआरएमधील झोपडपट्टी धारक खासगी विकासकांची नेमणुक करतात. या पद्धतीच्या अनेक पुर्नविकास प्रकल्पांमध्ये विकासक एक ते दिड वर्षांचे पर्यायी जागेचे भाडे देणे कबूल करतात.परंतु अनेक गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये अनेक विकासकांची कामे रखडल्याने त्यांनी भाडेही देणे बंद केले आहे.

कोविडमुळे मराठी बांधवांची रोजीरोटी गेल तसेच मुंबईतील मराठी माणसाला आपल्या आयुष्यातील सहा सहा तास
वसई-विरारच्या प्रवासात घालवावे लागतात. आहे ते घर विकासकाने अडवून ठेवल आहे आणि भाडे मिळण्याऐवजी
घरातून हकालपट्टी होत आहे. काही ठिकाणी तर इमारत तयार असूनही ना इमारत ताब्यात मिळत ना हक्काचे भाडेही
मिळत. त्यामुळे नाईलाजास्तव मराठी कुटुंब हक्काचे घर बिल्डरला किंवा एजंटला स्वस्त दरात विकत आहेत.

अशा प्रकरणांमध्ये सरकारने ठोस पावले उचलून जनतेला वेठीस धरणार्‍या बिल्डरांवर कडक कारवाई करावी.
या प्रकरणात आपण लक्ष घालून सर्व सामान्य मराठी माणसाला न्याय मिळवून द्यावा, असे नितेश राणे
(BJP MLA Nitesh Rane) यांनी या पत्रात म्हटले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :-  BJP MLA Nitesh Rane | BJP MLA nitesh rane letter to dcm devendra fadnavis for mumbai builder and allegation on shiv sena aaditya thackeray

हे देखील वाचा :

Dussehra Melava | शिंदे गटाला मोठा धक्का! शिवाजी पार्कवर ठाकरेंचाच आवाज…, उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याला हायकोर्टाची परवानगी

Shrikant Eknath Shinde | राष्ट्रवादीने पोस्ट केलेल्या ‘त्या’ फोटोवर श्रीकांत शिंदेंचे स्पष्टीकरण; म्हणाले – ‘मी दोन टर्म खासदार आहे, मला…’

Ajit Pawar | जेव्हा जेव्हा उपमुख्यमंत्री झालो तेव्हा गृहमंत्री करा म्हंटलं, पण वरिष्ठांनी…, अजित पवारांनी बोलून दाखवली मनातली खदखद

Related Posts