IMPIMP

बनावट जात प्रमाणपत्र प्रकरण : भाजपचे खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी डोक्याला हात लावत म्हणाले – ‘राजकारणापेक्षा मठच बरा होता’

by sikandershaikh
jay siddheshwar mahaswami

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी (Dr. jayasiddheshwar mahaswami) यांनी लोकसभा निवडणुकीत बनावट जात प्रमाणपत्र वापरल्याप्रकरणी सोलापूर शहर पोलिसांनी बुधवारी (दि 3 मार्च) महास्वामी यांची 2 तास चौकशी केली. यात त्यांनी काय जबाब दिला हे समजू शकलेलं नाही. परंतु अशी माहिती समोर आली आहे की, माझं धार्मिक कार्य बरं होतं. का म्हणून राजकारणात पडलो. राजकारणापेक्षा मठच बरा होता अस म्हणत महास्वामी यांनी डोक्यालाच हात लावला.

गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय साळुंखे यांनी बुधवारी पोलीस आयुक्तालयात सकाळी 2 तास महास्वामी यांची कसून चौकशी केली. चौकशीतून नेमकं निष्पन्न झालं हे अद्याप समजू शकलेलं नाही.

पुन्हा एकदा चौकशीला यावं लागणार

गुन्हे शाखेनं महास्वामी यांची प्राथमिक चौकशी केली आहे. परंतु काही प्रश्नांची उत्तरं स्पष्टपणे न मिळाल्यानं गरज पडल्यास त्यांना पुन्हा एकदा चौकशीला बोलवलं जाईल असं पोलीस सूत्रांनी सांगितलं आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंत चौकशी अहवाल न्यायालयात सादर केला जाणार आहे असंही सांगण्यात आलं आहे.

नेमकं प्रकरण काय ?

लोकसभा निवडणूक 2019 मध्ये सोलापूर मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित होता. भाजपचे खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी (jayasiddheshwar mahaswami) यांनी त्यांचा अनुसूचित जातीमधील दाखला बेडा जंगम असल्याचं प्रमाणपत्र सादर केलं होतं. या प्रमाणपत्रावर विनायक कंदकोरे, प्रकाश गायकवाड, मऱ्याप्पा मुळे यांनी आक्षेप घेतला होता. परंतु त्यांची ही हरकत फेटाळण्यात आली होती.
तेव्हा जयसिद्धेश्वर महास्वामी हे निवडून आले.
याबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड व मूळ तक्रारदारांनी सामाजिक न्याय विभागातील जात पडताळणी विभागाकडे तक्रार केली होती.
जात पडताळणी समितीनं चौकशी केली असता त्यात उमरगा आणि अक्कलकोट तहसिल कार्यालयात बनावट नोंदी असल्याचं निदर्शनास आलं.

जात पडताळणी समितीनं तत्कालीन तहसिलदारांना जात प्रमाणपत्र बनावट असल्याचं कळवलं व त्याबद्दल तक्रार देण्याचे आदेश केले.
तत्कालीन तहसिलदार बाळासाहेब सिरसट यांनी याबाबत न्यायालयात तक्रार दाखल केली होती.
न्यायालयानं ही तक्रार सदर बझार पोलीस ठाण्यात पाठवून त्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.
न्यायालयाच्या आदेशावरून जयसिद्धेश्वर महास्वामी, अक्कलकोट आणि उमरगा येथील तहसिल कार्यालयातील अज्ञात प्रशासकीय अधिकारी यांच्या विरोधात गु्न्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी शिवसिद्ध बुळ्ळा याच्यावर संशय बळावला आणि त्याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली.

‘भाषणात म्हणायचं हिंदुत्व कायम आहेच, निभवायची वेळ आली की…’ : भाजप

Related Posts