IMPIMP

BJP On Thackeray Government | ‘आदित्य पक्षातील घाण गेली म्हणतात अन् मुख्यमंत्री आमदारांना आवाहन करतात, किती नाटकीपणा ?’; भाजपचा निशाणा

by nagesh
BJP On Thackeray Government | BJP Keshav Upadhye On Shivsena Aditya Uddhav Thackerary Government Sanjay Raut

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन BJP On Thackeray Government | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी
बंड पुकारल्याने राज्यात राजकीय वादळ निर्माण झालंय. अशातच शिवसेना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) आणि आदित्य ठाकरे (Aditya
Thackeray) यांनी शिंदे गटाला लक्ष्य केलं आहे. तर दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी
आज पुन्हा एकदा शिंदे गटातील आमदारांना भावनिक आवाहन करत ‘परत या चर्चेतून मार्ग काढू,’ असं म्हटलं आहे. यानंतर आता भाजपने (BJP) शिवसेना (Shivsena) आणि ठाकरे सरकारवर (Thackeray Government) जोरदार निशाणा साधला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

“आदित्य पक्षातील घाण गेली म्हणतात अन् मुख्यमंत्री आमदारांना आवाहन करतात, किती नाटकीपणा ?,” असं भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटलं आहे. “मुख्यमंत्री एकीकडे मंत्र्यांची खाती काढतात. आदित्य ठाकरे हे आमदारांना उद्देशून पक्षातील घाण गेली म्हणतात. संजय राऊत बळीची भाषा करतात आणि एवढं सगळं झाल्यावर परत उद्धव ठाकरे आमदारांना भावनिक आवाहन करतात. किती देखावा किती नाटकीपणा ?” असा टोला उपाध्ये यांनी लगावला आहे. (BJP On Thackeray Government)

“सत्ता गेली, संघटना गेली, सहानभूती, हिंदुत्व सुटलं पण गेली अडीच वर्षांचे मुख्यमंत्रीपद मिळाले पण वर्षानुवर्षांची पुण्याईसुध्दा गेली” अशी टीका देखील उपाध्ये यांनी केली.
दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) सुनावणीनंतर आज पहिल्यांदाच एकनाथ शिंदे हे रॅडिसन हॉटेलच्या गेटवर आले होते.
यावेळी माध्यमासोबत त्यांनी संवाद साधला.
‘आमचे कोणतेही आमदार कुणाच्या संपर्कात नाहीत, जे कुणी संपर्कात असतील, त्यांची नावं सांगा,’ असं थेट आव्हान शिंदे यांनी केलं आहे.

Web Title :- BJP On Thackeray Government | BJP Keshav Upadhye On Shivsena Aditya Uddhav Thackerary Government Sanjay Raut

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील अट्टल गुन्हेगार युसुफ उर्फ आतुल खान औरंगाबाद कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध, MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची 70 जणांवर कारवाई

Maharashtra Rain Update | राज्यभर मान्सून सक्रिय ! आगामी 3 ते 4 दिवस कोकणात मुसळधार पाऊस – IMD

Beetroot Benefits | ‘या’ कारणांमुळे बीट अत्यंत पौष्टिक मानले जाते, महिनाभर सेवन केल्यास आश्चर्यकारक फायदे; जाणून घ्या

Related Posts