IMPIMP

BJP State President | भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्ष फडणवीसांचे निकटवर्तीय, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदासाठी ‘हे’ नाव चर्चेत

by nagesh
Maharashtra Politics | dilip bhoir resigns from shetkari kamgar paksh joined bjp in the presence of chandrashekhar bawankule

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन BJP State President | राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजपमध्ये पक्षांर्तगत पदाधिकारी बदलांच्या हालचालींना वेग आला आहे. मुंबई (Mumbai) आणि महाराष्ट्र भाजपचे (Maharashtra BJP) दोन्ही अध्यक्ष मंत्री झाल्याने याठिकाणी आता नव्या प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती होणार आहे. यामध्ये मुंबई प्रदेशाध्यक्षपदासाठी भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांचे नाव निश्चित मानले जात आहे. परंतु भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची (BJP State President) निवड करताना भाजपकडून पुन्हा अनपेक्षित नावाला संधी दिली जाऊ शकते.

भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष (BJP State President) चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची मंत्रिमंडळात (Cabinet) वर्णी लागल्याने त्यांच्या जागेवर चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांच्या नावाची चर्चा सुरु झाली. मात्र आता या शर्यतीत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे अत्यंत निकटवर्तीय आमदार संजय कुटे (MLA Sanjay Kute) यांचे नाव अचानक चर्चेत आले. भाजपकडून लवकरच मुंबई आणि महाराष्ट्राचे नवे प्रदेशाध्यक्ष अधिकृतरित्या जाहीर केले जाणार आहेत. या शर्यतीत अखेरच्या क्षणी संजय कुटे यांची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे पहावे लागेल. आशिष शेलार यांच्याप्रमाणे संजय कुटे हे फडणवीस यांच्या मर्जीतील असल्याचे राजकीय वर्तुळात मानले जाते.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी शिवसेनेत (Shivsena) बंड करुन सुरत आणि गुवाहाटीला पोहोचले.
त्या सर्वांची व्यवस्था संजय कुटे पाहत होते.
शिंदे गटाने (Shinde Group) शिवसेनेकडून पुकारलेल्या बंडानंतर भाजपकडून सर्वप्रथम एकनाथ शिंदे यांच्याशी संजय कुटे यांनी संपर्क केला.
देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील असल्याने कुटे यांच्यावर ही कामगिरी सोपवण्यात आली होती.
यानंतर आता कुटे हे थेट भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होऊ शकतात.

नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात (Cabinet Expansion) भाजपच्या ज्या नेत्यांना संधी दिली गेली होती.
त्या यादीवर फडणवीस यांचा प्रभाव असल्याचे स्पष्ट दिसत आहेत.
त्यानंतर आता संजय कुटे हे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष झाल्यास मंत्रिमंडळापाठोपाठ भाजप संघटनेतील नियुक्त्याही फडवणीस यांच्या कलाने होत असल्याचे सिद्ध होते.

Web Title : –  BJP State President | ashish shelar will be new mumbai bjp chief race between sanjay kute and chandrashekhar bawankule for maharashtra bjp president

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis | खातेवाटप कधी होणार ? देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य, म्हणाले..

Pankaja Munde | ’17 ऑगस्टपूर्वीच खातेवाटप, पंकजा मुंडेंना मोठे पद मिळेल’ – गिरीश महाजन

Pune Pimpri Crime | बेपत्ता झालेल्या 4 वर्षाच्या चिमुकलीचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ

Related Posts