IMPIMP

BJP Vs Congress In Maharashtra | भाजपच्या दोन दिग्गजांमध्ये बेबनाव…, काँग्रेस नेत्याचं विधान

by nagesh
BJP Vs Congress In Maharashtra | disharmony between deputy chief minister devendra fadnavis and ashish shelar congress leader sachin sawant statement

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   BJP Vs Congress In Maharashtra | ट्विटरवर व्हिडीओ जारी करत भाजपचे नेते, आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी श्रद्धा वालकर खुनाबद्दल टिप्पणी केली होती. समोर आलेल्या माहितीनुसार श्रद्धाने २०२० साली आफताब विरुद्ध तक्रार नोंदवली होती. तुळींज पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीनुसार श्रद्धाने आफताबपासून तिच्या जीवाला धोका असल्याची तक्रार नोंदवली होती. नंतर तिने सदर तक्रार मागे घेतली होती. पण आशिष शेलार यांनी या तक्रारी संबंधात तत्कालीन सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या ट्विटला काँग्रेसचे नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी उत्तर दिले आहे. (BJP Vs Congress In Maharashtra )

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

‘राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व आशिष शेलार यांच्यात बेबनाव (भांडण) असल्याचे दिसून येते. सदर माहिती शेलार यांना त्यांच्याकडून प्राप्त होऊ शकते. राज्यात भाजपाची सत्ता आहे हे विसरले का? चुकीचे वर्तन झाले असल्यास पोलिसांवर कारवाई करणार की नाही याचे आधी उत्तर द्या.’ असे सचिन सावंत यांनी म्हटले आहे. (BJP Vs Congress In Maharashtra)

‘श्रद्धा वालकरने २३ नोव्हेंबर २०२० रोजी लिहिलेल्या पत्रानुसार माझ्या जीवाला आफताबपासून धोका आहे. आफताब माझी हत्या करू शकतो, अशी लेखी तक्रार श्रद्धाने आफताब विरोधात नोंदवली होती. मग, महाराष्ट्र पोलिसांनी या पत्राची दखल का घेतली नाही? पोलिसांवर कोणाचा दबाव होता का? सरकारमध्ये बसलेल्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे समर्थन होते म्हणून? की या सर्व प्रकारावर पांघरूण घालायचे होते? या सगळ्याची चौकशी होणे ही काळाची गरज आहे. तत्कालीन पोलीस आणि सरकारने कडक कारवाई केली असती तर, श्रद्धा आज वाचली असती. माझी पोलिसांना विनंती आहे की, हे पत्र दाबण्यात आले का? याची चौकशी दडपण्यात आली का? आफताबवर कारवाई होऊ नये याबाबत कुणाचे दडपण होते का? या सर्वांची चौकशी होणे गरजेचे आहे.’ असे आशिष शेलार त्यांच्या ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये बोलताना दिसतात.

तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अशा चौकशी संदर्भात आदेश दिल्याचे ट्विट केले होते, त्यामुळे आशिष शेलार
यांनी असा व्हिडीओ टाकण्याचे कारण काय असा प्रश्न पडला असताना काँग्रेसच्या सचिन सावंत यांनी याला
आंतरिक कलहाचे स्वरूप देऊन भाजपला चांगला टोला लावला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- BJP Vs Congress In Maharashtra | disharmony between deputy chief minister devendra fadnavis and ashish shelar congress leader sachin sawant statement

हे देखील वाचा :

MP Udayanraje Bhosale | राज्यपालांना अडीच वर्षात शिवाजी महाराज समजले नाहीत, त्यांना तात्काळ पदमुक्त करा; उदयनराजेंची पक्षश्रेष्ठींकडे मागणी

Sanjay Raut On Maharashtra Karnataka Border Issue | ‘एकीकडे गुजरात उद्योग आणि कर्नाटक गावं पळवत असताना मुख्यमंत्री मात्र तंत्रमंत्रात अडकले’ – संजय राऊत

FIFA World Cup 2022 | घानाविरुद्धच्या सामन्यात रोनाल्डोने गोल करताच ‘हा’ विश्वविक्रम होणार त्याच्या नावावर

Related Posts