IMPIMP

Blade India | पुण्यातून मुंबईसाठी हेलिकॉप्टर सेवा सुरू

by nagesh
Blade India | pune lohegaon airport closure chopper firm to operate sorties to from mumbai

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Blade India | धावपट्टी दुरुस्तीसाठी लोहगाव विमानतळ १६ ते २९ ऑक्टोबर दरम्यान बंद राहणार आहे. पुण्यापासून तब्बल २५ हून अधिक शहरांशी असणारी एअर कनेक्टिव्हिटी तुटणार आहे. त्यामुळे उद्योजक, नोकरदार, पर्यटक आणि विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे. त्या पार्श्ववभूमीवर पुण्यातून मुंबईला जाण्यासाठी हेलिकॉप्टरची सेवा प्रवाशांना उपलब्ध झाली आहे. १६ ऑक्टोबरपासून ही सेवा सुरु होणार असून यासाठी प्रवाशांना आता थोडे ज्यादा पैसे मोजावे लागणार आहेत. ब्लेड इंडियाच्या (Blade India) संकेतस्थळावर या हेलिकॉप्टर सेवेबाबतचे अधिक तपशील देण्यात आले आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

पुण्यातील खराडी (Kharadi) येथून हे हेलिकॉप्टर सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी सुटेल. मुंबईत जुहू येथे ४५ मिनिटांत ते पोहचेल. तर मुंबईहून ४ वाजून ३० मिनिटांनी हे हेलिकॉप्टर निघून पुण्यात पोहचेल. तसेच मुंबईतून सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी हेलिकॉप्टर पुण्यासाठी निघेल. ते (Blade India) हेलिकॉप्टर दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी पुण्यातून मुंबईला निघेल. या हेलिकॉप्टरमध्ये एकाचवेळी ५ प्रवासी प्रवास करू शकतील. प्रवाशाने रिटर्न तिकिट बुक केले तर ते २९ हजार ५०० रुपयांना असेल. एका बाजूचे तिकिट १५ हजार ५०० रुपये असेल. यामुळे पुण्याहून तात्काळ मुंबईला जाणे अतिशय सोयीचे झाले आहे. याचा उद्योजकांसह इतरांना देखील फायदा होणार आहे.

Web Title: Blade India | pune lohegaon airport closure chopper firm to operate sorties to from mumbai

हे देखील वाचा :

Chitra Wagh | रुपाली चाकणकर यांना ‘शूर्पणखा’ संबोधलेलं नाही, चित्रा वाघ यांचे स्पष्टीकरण (व्हिडिओ)

NCB च्या कारवाईवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा नवीन गौप्यस्फोट, केले अतिशय गंभीर आरोप (व्हिडीओ)

BJP-Shivsena Alliance | ‘… तर शिवसेनेचे 56 आमदार भाजपसोबत असते’, शिवसेनेच्या या दिग्गज मंत्र्याचं वक्तव्य

Related Posts