IMPIMP

Bombay High Court | ‘या’ प्रकरणात शिवसेना माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना न्यायलयाचा दणका

by nagesh
Bombay High Court | bombay high court rejects the anticipatory bail plea filed by former shiv sena mp anandrao adsul

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात (Money laundering case) शिवसेनेचे (Shivsena) माजी खासदार आनंदराव अडसूळ (Former MP Anandrao Adsul) यांना मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) दणका दिला आहे. आनंदराव अडसूळ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून (Pre-arrest bail application rejected) लावला आहे. मागील महिन्यात देखील मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

ईडीने (ED) घरावर छापा टाकल्यानंतर तसेच चौकशीसाठी (Enquiry) बोलावल्यानंतर अटकेच्या (Arrest) भीतीने आनंदराव अडसूळ यांनी उच्च
न्यायालयात (Bombay High Court) धाव घेतली होती. त्यांनी ईडीचे समन्स (ED summons) रद्द करण्याची मागणी केली होती. परंतु उच्च
न्यायालयाने त्यांना कोणताही दिलासा देण्यास नकार दिला होता. तसेच अटक टाळायची असेल तर कनिष्ठ न्यायालायत दाद मागण्याची मुभा दिली होती. त्यानंतर अडसूळ यांनी विशेष न्यायालयात (special court) अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. विशेष न्यायालयाने त्यांच्या जामीन अर्जावर निर्णय देताना अडसूळ यांना अटकेपासून अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला होता.

आनंदराव अडसूळ हे बँकेचे माजी अध्यक्ष असून त्यांनी बँकेत 980 कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार (corruption) केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवलेल्या गुन्ह्याच्या आधारे अंमलबजावणी संचालनालयाने या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title :- Bombay High Court | bombay high court rejects the anticipatory bail plea filed by former shiv sena mp anandrao adsul

हे देखील वाचा :

Rain On Orchestra Bar | पोलिसांच्या छाप्यावर भरोसा कसा ठेवायचा?; ऑर्केस्ट्रा बारच्या छाप्यात 540 रुपये केले जप्त

Parambir Singh | माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी निलंबनाचा आदेश धुडकावला

Shirdi News | थंडीने गारठून शिर्डीत दोन जणांचा मृत्यू?, राज्यात अनेक शेळ्या-मेंढ्या दगावल्या

Related Posts