IMPIMP

Booster Dose | भारतीय नागरीकांना कोरोना लसीचा Booster डोस दिला जाणार? तज्ज्ञ म्हणाले…

by nagesh
Booster Dose | icmr focus is on vaccinating more and more people booster dose is not on the priority said icmr director general balram bhargava

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Booster Dose | कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लसीकरणाची मोहिम हाती घेण्यात आली. त्यानंतर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहाता लसीकरणाचा वेगही वाढवण्यात आला. भारतात आतापर्यंत 89.02 कोटी नागरीकांना कोरोना लस देण्यात आली आहे. बहुतांश नागरिकांनी कोरोना लसीचे 2 डोस घेतलेले आहेत. अशावेळी नागरिकांना कोरोना लसीचा बुस्टर डोस (Booster Dose) मिळणार का? असा सवाल उपस्थित होतो आहे. मात्र, यावरुन भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (ICMR) संचालक डॉ. बलराम भार्गव (Director Dr. Balram Bhargava) यांनी माहिती दिली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितलं आहे की, सध्या तरी प्रशासनाचं लक्ष देशातील सर्व वयस्क नागरिकांना कोरोना लसीचे 2 डोस देऊन त्यांचं लसीकरण पूर्ण करण्यावर आहे. अशावेळी बुस्टर डोसचा मुद्दा प्रासंगिक नाही. बुस्टर डोस (Booster Dose) देण्याविषयी चर्चा करण्याची ही योग्य वेळ नाही. सध्या देशातील सर्व नागरिकांपर्यंत कोरोना लस पोहचणं आवश्यक असल्याचं देखील डॉ. भार्गव यांनी म्हटलं आहे.

भारतात 69 टक्के सज्ञान नागरिकांना कमीत कमी 1 डोस देण्यात आला आहे.
तसेच 25 टक्के नागरिकांना कोरोना लसीचे 2 डोस देण्यात आले आहेत.
याबाबत केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण (Union Health Secretary Rajesh Bhushan) आकडेवारी सादर केली होती.
दरम्यान, शहरी भागांतील लसीकरण केंद्रांवर जवळपास 35 टक्के नागरिकांना लसीचा डोस (Corona Vaccination) देण्यात आला.
तर ग्रामीण क्षेत्रात लसीकरण केंद्रांवर 64 टक्के नागरिकांचं लसीकरण झालं. म्हणजेच ग्रामीण क्षेत्रातील लसीकरणाचा दर शहरी क्षेत्राहून जास्त आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

दरम्यान, कोरोना संक्रमण बऱ्यापैकी नियंत्रणात आला आहे.
तरी देखील नागरिकांनी सणासुदीच्या काळात गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळायला हवं,
असा सतर्कतेचा इशारा देखील आरोग्य सचिव राजेश भूषण (Union Health Secretary Rajesh Bhushan) यांनी दिला आहे.
त्याचबरोबर नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग आणि अन्य कोरोना नियमांचं पालन करत उत्सवात सहभागी होण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.

Web Title :- Booster Dose | icmr focus is on vaccinating more and more people booster dose is not on the priority said icmr director general balram bhargava

हे देखील वाचा :

Modi Government | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! कोरोनामुळे नोकरी गमावणाऱ्या ESIC च्या कर्मचाऱ्यांना मिळणार 3 महिन्यांचा पगार

Hotel and Restaurant Association Western India | राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंटची वेळ रात्री 1.30 पर्यंत वाढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

Drug Mafia Rubina Shaikh | ड्रग माफियांचे मालेगाव कनेक्शन उघड; रुबीना शेखची २ कोटींची मालमत्ता

Related Posts