IMPIMP

Bribe Case | 5 हजाराची लाच घेताना महिला उप अभियंता जाळ्यात

by nagesh
Bribe Case | woman sub engineer caught red handed while taking 5000 rs bribe indore mp

इंदूर : वृत्तसंस्था Bribe Case | देशभरात अनेक लाचखोरीच्या घटना समोर येत आहेत. ज्यामध्ये महिलाही मागे राहिलेल्या नाहीत. अलीकडेच अशी अनेक प्रकरणं समोर आली आहेत. ज्यामध्ये एसीबी (ACB) किंवा लोकायुक्त पोलिसांनी (Lokayukta police) महिला कर्मचारी किंवा अधिकारी यांना लाच घेताना पडकलं आहे. असाच एक प्रकार मध्य प्रदेशची (Madhya Pradesh) राजधानी इंदोरमध्ये (Bribe Case) घडला आहे. लोकायुक्त पोलिसांनी एका महिला उप अभियांत्याला पाच हजाराची लाच घेताना रंगेहाथ (Accepting Bribe) पकडले. संबंधित महिलेला लाच घेतल्याप्रकरणी अटक (Arrest) करण्यात आली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

गीता विजयवर्गीय (Gita Vijayvargiya) असे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या उप अभियंत्याचे (woman Deputy Engineer) नाव आहे.
त्या जनपद पंचायतीत (Janpad Panchayat) कार्यरत आहेत. आरोपी विजयवर्गीय यांना 5 हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.
एका भूखंडावरील घराचा नकाशा (house Map) पास करण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
यासंदर्भात तक्रार मिळताच लोकायुक्त पोलिसांनी सापळा रचून महिलेला तिच्याच घरात लाच घेताना रंगेहाथ पकडले.

इंदूर येथील अशोक शर्मा (Ashok Sharma) यांना त्यांच्या प्लॉटवर घर बांधायचे होते.
त्यासाठी त्यांनी जनपद पंचायतीकडून नकाशा मंजूर करुन घेयचा होता.
नकाशा मंजूर करुन घेण्यासाठी शर्मा यांनी जनपद पंचायतीत रितसर अर्ज केला होता.
परंतु हा नकाशा मंजूर करण्यासाठी उप अभियंता गीता वीजयवर्गीय यांनी लाच (Bribe Case) मागितली. तसेच पैसे दिल्याशिवाय नकाशा पास करणार नसल्याचे सांगितले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

तक्रारदार यांनी लाच देण्याऐवजी थेट लोकायुक्त पोलिसांकडे तक्रर केली. तसेच त्यांच्यामध्ये झालेल्या संभाषणाचे रेकॉर्डिंग पोलिसांना दिले.
यानंतर पोलिसांनी तक्रारदार यांना लाचेची रक्कम घेऊन महिलेच्या घरी पाठवले. दरम्यान पोलिसांनी घराजवळ सापळा रचला.
गीता विजयवर्गीय यांनी तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्विकारल्यानंतर पोलिसांनी घरावर छापा (raid) टाकला.
तसेच त्यांच्याकडून लाचेची रक्कम जप्त करुन अटक केली.

Web Title : Bribe Case | woman sub engineer caught red handed while taking 5000 rs bribe indore mp

हे देखील वाचा :

Pune ST Workers Strike | सरकारने एसटी स्थानकात ‘सवत’ आणल्यानं ST कामगारांचा ‘जागरण गोंधळ

Pune Crime | पुण्याच्या हडपसरमधील धक्कादायक घटना ! प्रेमसंबंधाबाबत पतीला सांगून बदनामी करण्याची धमकी; 30 वर्षीय विवाहितेकडे शरीरसुखाची मागणी

Pune Crime | पुण्यात चोरट्यांनी मारला लेफ्टनंट कर्नलच्या घरातील दारुच्या बाटल्यांवर डल्ला

Related Posts