IMPIMP

Brown-Red Rice | वजन कमी करण्यासाठी लाल किंवा तपकिरी भात उपयुक्त

by nagesh
Brown-Red Rice | brown or red rice what is better for weight loss diet

सरकारसत्ता ऑनलाइन – Brown-Red Rice | हृदयविकाराचा त्रास (Heart Disease) असलेल्या रुग्णांना किंवा लठ्ठ असलेल्यांना हृदयविकारापासून जपण्यासाठी वजन नियंत्रित (Weight Control) करण्याचा सल्ला दिला जातो. यात तुम्हाला वजन कमी करताना व्यायामाबरोबरच प्रथम भात न खाण्याची सूचना ही असते. विशेषत: तुम्ही जर भातप्रेमी असाल तर त्यांच्यापासून दूर राहणे हे तुमच्यासाठी शिक्षेपेक्षा कमी नाही. पण पांढर्‍या तांदळा (White Rice) ऐवजी ब्राऊन किंवा लाल भात (Brown-Red Rice) खाऊन वजनावर नियंत्रण आणू शकतात.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी योग्य नियोजनाची गरज असते. ज्यामध्ये वर्कआउट्सपासून ते संतुलित आहाराचे (Balanced Diet) बदल समाविष्ट आहेत. आता पंचाईत होते ती नेहमी भात खाणार्‍यांची. त्यांना दररोज भातापासून दूर राहणे कठीण होऊन बसते. पण आता त्यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे. लाल किंवा तपकिरी तांदळाचा भात (Brown-Red Rice) खाऊन वजनही कमी ठेवता येते. कारण लाल तांदूळ आणि तपकिरी तांदूळ या दोघांमध्ये अँथोसायनिन (Anthocyanin) आहे. तसेच ते अँटी-ऑक्सिडेंट्स (Anti-oxidants) देखिल आहेत. याशिवाय लाल तांदळामध्ये मँगनीजचे (Manganese) प्रमाण असते.

कार्बोहायड्रेट्सचा पाचनप्रक्रियेत आणि कॅल्शियम शोषण्यात मँगनीजचा खुप उपयोग होतो. त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचं आहे, त्यांच्यासाठी लाल किंवा तपकिरी तांदळाचा भात एक सशक्त पर्याय आहे. चला तर मग जाणून घेऊया तपकिरी आणि लाल तांदळामध्ये काय काय आहे (Let’s Know What Is In Brown And Red Rice).

तपकिरी तांदूळ (Brown Rice) –
या तांदळामध्ये असणारी रंगद्रव्ये त्याला आपला रंग देतात. या रंगद्रव्याची पातळी वाढल्यास त्याचा रंग तपकिरीऐवजी लाल, काळा किंवा जांभळा होतो.
त्यामुळे लाल रंगाच्या तांदळाच्या भाताची चवही पांढर्‍या तांदळाच्या भातासारखीच लागते.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

लाल तांदूळ (Red Rice) –
अँथोसायनिन्स नावाच्या रंगद्रव्यांमुळे या तांदळाला लाल रंग मिळतो. लाल तांदूळ आणि तपकिरी तांदूळ या दोघांमध्ये अँथोसायनिन असते.
तसेच ते अँटी-ऑक्सिडेंट्स देखील आहेत. शिवाय लाल तांदळात मँगनीजही भरपूर असते.
कार्बोहायड्रेट्सचा पाचनप्रक्रियेत (Digestive Process) आणि कॅल्शियमचे संतुलन ठेवण्यात मँगनीजचा चांगला उपयोग होतो.

कोणता चांगला आहे (Which Is Better) ?
ज्यांना वजन कमी करायचे आहे, त्यांच्यासाठी दोघांपैकी एकाची निवड करणे कठीण होऊन बसते.
कारण दोन्हींमध्ये कार्बोहायड्रेट आणि प्रथिने समान प्रमाणात आहेत.
दोन्ही जातींमध्ये फायबरचे प्रमाण देखील बरेच सारखे आहे आणि म्हणूनच ते दोन्ही वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत.

कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात (What To Keep In Mind) ?
या दोन्ही तांदळात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण हे पांढर्‍या तांदळापेक्षा कमी आहे. जास्त कार्बोहायड्रेट्स खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो.
त्यामुळे पांढर्‍या तांदळापेक्षा हे दोन्ही म्हणजे लाल किंवा तपकिरी तांदूळ सरस आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

#हेल्थ टिप्स #हेल्दी लाइफस्टाइल #वजन कमी करण्याच्या टिप्स #हेल्दी डाइट #भात खाण्याच्या टिप्स #ब्राऊन राईसचे फायदे #लाल तांदळाचे फायदे #Lifestyle #Health #Health Tips #Healthy Lifestyle #Weight Loss Tips #Rice Intake Tips #Brown Rice Benefits #Red Rice Benefits #Brown Vs Red Rice #Healthy Diet #Lifestyle And Relationship #Health And Medicine

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Web Title :- Brown-Red Rice | brown or red rice what is better for weight loss diet

हे देखील वाचा :

Ujjwala Scheme | 1 वर्षात 1.5 लाख लोकांचा बचावला जीव, वायु प्रदूषण मृत्यूंमध्ये 13% घट; PM मोदी यांच्या ‘उज्ज्वला’ची कमाल, रिसर्चमध्ये खुलासा झाल्याचा दावा

NCP-AIMIM | महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खलबतं; एमआयएम-राष्ट्रवादीची युती होणार ?

Kirit Somaiya On Anil Parab | ‘चला दापोली, मंत्र्यांचं रिसॉर्ट तोडणार ?; किरीट सोमय्यांच्या ट्विटने खळबळ

Related Posts