IMPIMP

BSNL ‘या’ ग्राहकांना देतंय 4 महिन्यापर्यंत फ्री ब्रॉडबँड सर्व्हिस, जाणून घ्या सविस्तर

by nagesh
BSNL | bsnl offers up to 4 months of free broadband service to these subscribers

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) भारत फायबर आणि डिजिटल सबस्क्रायबर लाईन (DSL) ग्राहकांना चार महिन्यांसाठी ब्रॉडबँड सर्व्हिस फ्री देत आहे. सोबतच या ऑफरचा फायदा देशभरातील BSNL लँडलाईन आणि ब्रॉडबँड ओव्हर Wi-Fi (BBoWiFi) सबस्क्रायबर्ससाठी सुद्धा दिला जात आहे.

TelecomTalk च्या एका रिपोर्टनुसार, BSNL आपल्या भारत फायबर, DSL, लँडलाईन आणि BBoWiFi ग्राहकांना 36 महिन्यांचे भाडे एकदाच दिल्यास चार महिन्यांसाठी फ्री ब्रॉडबँड सर्व्हिस देत आहे. म्हणजे या ग्राहकांना 36 महिन्यांपर्यंत सर्व्हिस खरेदीवर एकुण 40 महिन्याची सर्व्हिस मिळेल.

सोबतच BSNL आपल्या ब्रॉडबँड ग्राहकांना 24 महिन्याची सर्व्हिस अ‍ॅडव्हान्समध्ये खरेदी केल्यास तीन महिने फ्री सर्व्हिस सुद्धा ऑफर करत आहे.
अशाप्रकार 12 महिन्याची सर्व्हिस अ‍ॅडव्हान्समध्ये खरेदी केल्यास ग्राहकांना एक महिन्याची सेवा फ्रीमध्ये मिळेल.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

ग्राहक या ऑफरचा फायदा टोल फ्री नंबर 1800003451500 वर फोन करून किंवा जवळच्या कस्टमर केयर सेंटरवर जाऊन घेऊ शकतात.
ही फ्री ब्रॉडबँड सर्व्हिस ऑफर सर्वप्रथम मागील वर्षी महाराष्ट्रात सादर करण्यात आली होती. मात्र, आता सर्व सर्कलमध्ये ती उपलब्ध आहे.

KeralaTelecom च्या रिपोर्टनुसार, करण्यात आलेला बदल सर्व भारत फायबर प्लानवर लागू होईल.
प्लानची किंमत 449 रुपयांपासून सुरू होऊन 1,499 रुपयांपर्यंत आहे. सोबतच Disney+Hotstar Premium प्लान बंद केला आहे.

Web Title : BSNL | bsnl offers up to 4 months of free broadband service to these subscribers

Sharad Pawar | अजित पवार मुख्यमंत्री होणार की नाही?, शरद पवार यांनी स्पष्टच सांगितलं…

Pune Crime | बनावट सर्टिफिकेट व अलॉटमेट लेटर देऊन 24 लाखांना गंडा; पुणे पोलिसांकडून दोघांना अटक
Nitesh Rane | दसरा मेळाव्यानंतर नितेश राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका, म्हणाले – ‘उद्धवजींमध्ये राहुलजी एकदम स्पष्टपणे दिसतात’
Gold Price Today | विजयादशमीनिमित्त सोनं खरेदीसाठी ग्राहकांची झुबंड; 400 कोटींचा टप्पा पार
Modi Government | नोकरीसोबत सुरू करा ‘हा’ व्यवसाय, 1 लाख रुपयांपर्यंत होईल नफा; मोदी सरकारकडून मिळेल 80% कर्ज
Aurangabad Accident | औरंगाबाद जिल्ह्यात ट्रॅक्टर-दुचाकीच्या भीषण अपघातात बहीण भावासह भाचीचा मृत्यू
Pune Crime | मंचरमध्ये कडप्प्याने मारहाण करुन खून
केवळ 8 हजार देऊन घरी घेऊन जा 86 kmpl मायलेजची TVS Star City Plus, केवळ इतका द्यावा लागेल EMI
Pune Crime | धक्कादायक ! पुण्यातील 36 वर्षीय विवाहित महिला डॉक्टरसोबत तरुणाचं विकृत कृत्य; नग्न होण्यास भाग पाडलं, अन्…

Related Posts