IMPIMP

Budget 2023 | अर्थसंकल्पातील शेतकऱ्यांसाठीच्या योजनांवरून राजू शेट्टींनी केंद्र सरकारला फटकारले; म्हणाले…

by nagesh
Budget 2023 | there is nothing for organic farming raju shetty strong displeasure over the budget

कोल्हापूर : सरकारसत्ता ऑनलाईन  Budget 2023 | शेतीसाठी सरकार करतयं काय? भरड धान्य शेतकऱ्याला परवडते का? सेंद्रीय शेतीचे
सरकारकडून फक्त तुनतुने वाजवलं गेलं. अशी टीका स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली. ते कोल्हापूर येथे आयोजीत पत्रकार परिषदेत
बोलत होते. (Budget 2023)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FM Nirmala Sitharaman) यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. यावेळी मोदी सरकारकडून (Modi Govt) विविध भरीव योजनांची घोषणा करण्यात आली. त्यात शेतकऱ्यांसाठी देखील मोदी सरकारने विविध योजनांची घोषणा केली आहे. मात्र यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) आणि अजित नवले (Ajit Navale) यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, ‘या बजेटवर मी समाधानी नाही. सेंद्रीय शेतीचे तुणतुणं वाजवलं गेलं. रासायनिक खाताच्या वाढत्या किमती नियंत्रणात कसं आणणार? या प्रश्नाचे उत्तर बजेटमध्ये दिले गेले नाही. डेअरी आणि पोल्ट्रीसाठी (Dairy and Poultry) तोकडी तरतूद केली आहे. उसाचा एफ आर पी (Sugarcane FRP) प्रमाणे हमीभाव कायदेशीर करा अशी मागणी आहे. ऊस वजन करणारे काटे डिजिटल करण्याची मागणी होतं नाही. तर मग प्रत्यक्ष डिजिटलायझेशन होणार का?’ असा सवाल शेट्टी यांनी यावेळी बोलताना केंद्राला विचारला. (Budget 2023)

तर यावर पुढे बोलताना शेट्टी म्हणाले की, कापूस उत्पादकांसाठी (Cotton Growers) नवनवीन बियाणे आणि संशोधन करण्यासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल साठवून ठेवण्यासाठी गोडाऊन उपलब्ध नाही. किमान हमीभाव कायदा करावा तरच शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील. असेही यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले.

बाजरीला (Millet) केंद्र सरकारने कधी हमीभाव दिला का? बाजारातील बाजरीच्या किंमती आणि सरकारने दिलेल्या हमीभाव यामध्ये कधी मेळ लागला का? देशाला बाजरी उत्पन्नामध्ये नंबर वन बनवण्याची संकल्पना चांगली आहे. जिरायत शेतीमालाला हमीभावाची जोड देण्याची आवश्यकता आहे. मात्र यापूर्वी पिकाला हमीभाव देणारा कायदा अनिवार्य करणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया राजू शेट्टींनी यावर बोलताना दिली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

तर, या अर्थसंकल्पावर बोलताना अखिल भारतीय किसान सभेचे सहसचिव अजित नवले यांनी देखील टीका केली आहे.
अजित नवले म्हणाले, ‘शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत मोदी सरकार दुप्पट करणार होते.
प्रत्यक्षात पीक उत्पादनातून येणाऱ्या शेती उत्पन्नात घट झालेली आहे.
सरकारी आकडेवारी नुसार पिकापासून शेतकऱ्यांना येणारे उत्पन्न प्रतिदिन केवळ २७ रुपयांवर आले आहे.
शेतीमालाचे भाव सातत्याने पाडले गेल्याने शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा वाढतो आहे.
परिणामी मोदी सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्यांचा आकडा ३ लाख २५ हजारांपर्यंत पोहचला आहे.
अशा पार्श्वभूमीवर मांडण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पाकडून शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा होत्या.
मात्र शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल अशा तरतुदी न केल्याने शेतकऱ्यांची मोठी निराशा झाली आहे.’
अशी टीका यावेळी बोलताना अजित नवले यांनी केली.

Web Title :- Budget 2023 | there is nothing for organic farming raju shetty strong displeasure over the budget

हे देखील वाचा :

Pune By Elections | कसब्याची जागा आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच! इच्छुकांची मोठी यादी

Budget 2023 | मोदी सरकारच्या अर्थसंकल्पावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

Pune Crime News | दहशत माजवणाऱ्या पुण्यातील सराईत गुन्हेगारावर स्थानबद्धतेची कारवाई, MPDA कायद्यान्वये CP रितेश कुमार यांची दुसरी कारवाई

Related Posts