IMPIMP

Buldhana Crime | राहण्यासाठी खोली शोधणाऱ्या दाम्पत्याला 2 नराधमांनी आडवलं, पतीला बेदम मारहाण करत 24 वर्षीय विवाहितेवर केला बलात्कार, परिसरात खळबळ

by nagesh
Pune Pimpri Chinchwad Crime | A woman was molested by making obscene comments, and her husband was brutally beaten when he asked for a jab; Incidents in Dehu Road area

बुलढाणा : सरकारसत्ता ऑनलाइनBuldhana Crime | बुलढाणा शहरातील धाड येथे राहण्यासाठी भाड्याने (Rent) रूम शोधण्यासाठी गेलेल्या
दाम्पत्याला चिखला घाटात दोन नराधमांनी अडवलं. या नराधमांनी पतीला (Husband) बेदम मारहाण (Beating) करत एका 24 वर्षीय विवाहितेवर
बलात्कार (Rape Case) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महिला दिनाच्या (Women’s Day) पूर्वसंध्येला ही घटना घडल्यामुळे
बुलढाणा जिल्ह्यात (Buldhana Crime) खळबळ उडाली आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी (Buldhana Rural police) दोन अज्ञातांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संबंधित दाम्पत्य शहरातील एका नगरात वास्तव्यास आहे. सोमवारी हे दाम्पत्य भाड्याने रूम शोधण्यासाठी धाड येथे सायंकाळी साडेपाचला पोहोचले. त्यानंतर काम आटपून रात्री 10 ते 10.15 वाजण्याच्या सुमारास हे दाम्पत्य पुन्हा बुलढाण्याकडे परतु लागले. त्यावेळी चिखली घाटात (Chikhali Ghat) दोन अज्ञातांनी त्यांची दुचाकी अडवली. पतीला बेदम मारहाण केली. एकाने पतीला धरले तर दुसऱ्याने पीडितेला रस्त्याच्याकडेला नेऊन तिच्यावर जबरदस्ती लैंगिक अत्याचार (Sexual Harassment) केला. त्यानंतर दुसऱ्यानेही विवाहितेवर जबरदस्ती अत्याचार केला. (Buldhana Crime)

या घटनेनंतर भयभीत झालेल्या दाम्पत्याने थेट जिल्हा सामान्य रुग्णालय (District General Hospital) गाठले.
त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने ग्रामीण पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी रुग्णालयात जाऊन पीडिता व तिच्या पतीचा जबाब घेतला. याप्रकरणी विवाहितेची वैद्यकीय तपासणी (Medical Examination) केल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी दोन अज्ञातांविरुद्ध विविध कलमांन्वये आज सकाळी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सदानंद सोनकांबळे (API Sadanand Sonkamble) करीत आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

अधिकाऱ्यांनी घेतली पीडितेची भेट
जागतिक महिला दिनाच्या पूर्व संध्येला हा प्रकार घडल्याने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे.
पीडिता आणि तिच्या पतीची रुग्णालयात जाऊन अपर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे (Addl SP Bajrang Bansode),
उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम (Sub-Divisional Police Officer Sachin Kadam) यांनी विचारपूस केली.

Web Title :- Buldhana Crime | husband and wife were stopped by 2 men sexual abuse on married incident in buldhana district

हे देखील वाचा :

Post Office | पोस्ट ऑफिसमध्ये केली असेल गुंतवणूक तर 1 एप्रिलपूर्वी करा ‘हे’ काम, अन्यथा मिळणार नाही व्याजJalgaon Crime | सेवानिवृत्त शिक्षकांनी 2 अल्पवयीन मुलींवर केले अत्याचार ! पोलिसांनी घेतले ताब्यात, परिसरात प्रचंड खळबळ

Pune Crime | सराईत वाहनचोरांना लोणीकाळभोर पोलिसांनी केली अटक, पावणे तीन लाखांची वाहने जप्त

TET Exam Scam | प्रितीश देशमुखने 20 लाख दिलेला हरीदास ठोळ कोण ? टीईटी गैरव्यवहार प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता

Related Posts