IMPIMP

Business Idea | अतिशय कमी गुंतवणुकीत घराच्या छतावर सुरू करा हा बिझनेस, लाखो रूपयांची होईल कमाई

by nagesh
Business Idea | business idea start a solar panel with low investment earn lakh of rupees

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Business Idea | आज आपण अशी बिझनेस आयडिया जाणून घेणार आहोत ज्यामध्ये तुम्ही घराचे रिकामे छत देखील वापरून कमाई करू शकता. हा सोलर पॅनलचा (Solar Panel) बिझनेस आहे. हे कुठेही लावता येते. आपल्या छतावर हे लावून वीज तयार करू शकता आणि वीज विभागाला वीज सप्लाय करू शकता. यातून तुम्हाला मोठी कमाई होऊ शकते. कारण शहर असो, की गाव, वीजेची मागणी दोन्ही ठिकाणी सतत वाढत आहे. सोलर पॅनलसाठी केंद्र सरकारकडून 30 टक्के सबसिडी सुद्धा मिळते आणि यामध्ये 1 लाख रूपयांचा खर्च येतो. (Business Idea)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

किती येईल खर्च
सरकार लोकांना सोलर प्लांट लावण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. काही राज्यांनी इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये सोलर प्लांट आवश्यक केले आहेत. तुमच्याकडे सुद्धा सोलर प्रॉडक्ट विकण्याचा व्यवसाय करण्याची संधी आहे.

सोलर एनर्जीसंबंधी बिझनेस सुरू करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियासह अनेक बँकांच्या एसएमई ब्रँचकडून लोन मिळत आहे. प्रत्येक राज्याच्या हिशेबाने हा खर्च वेगवेगळा आहे. परंतु, सरकारकडून मिळणार्‍या सबसिडीनंतर एक किला वॅटचा सोलर प्लांट केवळ 60 ते 70 हजार रुपयात इन्स्टॉल होतो. (Business Idea)

1 लाख रूपयांपर्यंत होईल कमाई
हा बिझनेस सुरू करण्यासाठी गुंतवणूक खुप कमी आहे. परंतु जर तुमच्याकडे पैसे नसतील तर अनेक बँका यासाठी कर्ज देतात. तुम्ही यासाठी सोलर सबसिडी स्कीम, कुसुम योजना, राष्ट्रीय सौर ऊर्जा मिशन अंतर्गत बँकेकडून एसएमई कर्ज घेऊ शकता. एका अंदाजानुसार या बिझनेसमधून महिन्याला 30,000 रूपयांपासून 1 लाख रूपयांपर्यंत सहज कमाई होते.

सोलर पॅनलकडून लाभ
सोलर पॅनलचे वयोमान 25 वर्षांचे असते. हे पॅनल तुम्ही तुमच्या छतावर सहज लावू शकता. यातून तुम्हाला मोफत वीज मिळेल. सोबतच शिल्लक वीज ग्रिडद्वारे सरकार किंवा कंपनीला विकू शकता. म्हणजे फ्रीसोबत कमाई सुद्धा. जर तुम्ही तुमच्या छतावर 2 किलो वॅटचा सोलर पॅनल लावला तर दिवसात 10 तास उन पडण्याच्या स्थितीत यातून सुमारे 10 यूनिट वीज तयार होईल. महिन्याचा हिशोब केला तर दोन किलावॅटच्या सोलर पॅनलमधून सुमारे 300 यूनिट वीज तयार होईल.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मेंटनन्स
सोलर पॅनलच्या मेंटनन्समध्ये जास्त त्रास नाही. दर 10 वर्षात त्याची बॅटरी बदलावी लागते.
याचा खर्च सुमारे 20 हजार रूपये आहे. सोलर पॅनल तुम्ही एका ठिकाणाहून दुसरीकडे सुद्धा नेऊ शकता.

Web Title :- Business Idea | business idea start a solar panel with low investment earn lakh of rupees

हे देखील वाचा :

Share Market Crash | गुंतवणुकदारांचा आक्रोश ! मंदीची चाहूल लागल्याने शेयर बाजार क्रॅश, Sensex 1000 अंकापेक्षा जास्त कोसळला

Diabetes Food | मधुमेहाच्या रोग्यांसाठी काळ्या हरभर्‍याचे पाणी आहे वरदान, जाणून घ्या ते बनवण्याची आणि पिण्याची योग्य पद्धत

LIC Children Money Bank Plan | मुलांच्या शिक्षणाचे राहणार नाही टेन्शन ! रोज जमा करा केवळ 150 रुपये, बनवा 19 लाखाचा फंड

Related Posts