IMPIMP

Business Idea | केवळ 15000 रूपयात सुरू करा ‘हा’ सुपरहिट बिझनेस, 3 महिन्यात कमावू शकता लाखो रूपये; जाणून घ्या

by Team Deccan Express
LIC Policy | lic jeevan pragati plan give rs 28 lakh on maturity just invest of rs 200 per day

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Business Idea | तुम्ही मोठे उत्पन्न मिळवण्याचा विचार करत असाल तर आम्ही एक अशी आयडिया देत आहोत, जिथे अतिशय कमी भांडवलात चांगला नफा कमावू शकता. या बिझनेसमध्ये केवळ तुम्हाला एकदा 15000 रूपये लावायचे आहेत. यानंतर तुम्ही 3 लाख रूपयांपर्यंत कमाई करू शकता (Business Idea). इतकेच नाही तर हा बिझनेस सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडून (Central Government Subsidy) मदत सुद्धा दिली जात आहे. आम्ही तुळशीच्या शेती (Basil Cultivation) बाबत सांगत आहोत. बाजारात सध्या मेडिसिनल प्लांटची मोठी मागणी आहे. यासाठी तुम्ही भाडेतत्वावर शेत घेऊ शकता. (Basil Cultivation Tulsi Farming)

तुळशीची शेती मेडिकल प्लांटच्या अंतर्गत येते. मेडिसिनल प्लांटच्या शेतीसाठी मोठ्या शेतीची गरज नसते. तसेच जास्त गुंतवणूक करावी लागत नाही. सध्या अनेक कंपन्या मेडिकल प्लांटची शेती करत आहेत. यासाठी काही हजार रूपये खर्च करावे लागतील. परंतु कमाई लाखोमध्ये होते.

तीन महिन्यात तीन लाखाची कमाई

साधारणपणे तुळशीला धार्मिकसंबंधीत समजले जाते, परंतु औषधी गुणधर्म असलेल्या तुळशीतून कमाई केली जाऊ शकते. तुळशीचे अनेक प्रकार असतात, ज्यामध्ये यूजेनॉल आणि मिथाईल सिनामेट असते. याचा वापर कॅन्सर सारख्या गंभीर आजारांवर औषध बनवण्यासाठी केला जातो. एक हेक्टर शेतात तुळस लावल्यास केवळ 15000 रूपयांचा खर्च येतो. परंतु तीन महिन्यानंतर हे पिक तीन लाखापर्यंत विकले जाते. (Business Idea)

कशी होते तुळशीची शेती

तुळशीच्या शेतीसाठी चिकट माती सर्वात चांगली मानली जाते. जुन-जुलैमध्ये बियांद्वारे नर्सरी तयार केली जाते. नर्सरी तयार झाल्यानंतर त्याची लावणी केली जाते. लावणी दरम्यान दोन्ही ओळींमध्ये अंतर 60 सें.मी. आणि रोपापासून रोपाचे अंतर 30 सें.मी. ठेवले जाते. 100 दिवसांच्या आत ते तयार होते, ज्यानंतर कापणीची प्रक्रिया सुरू होते.

या कंपन्यांसोबत करू शकता कमाई

तुळशीची शेती पतंजली, डाबर, वैद्यनाथ इत्यादी आयुर्वेदिक औषधे बनवणार्‍या कंपन्या काँट्रॅक्ट फार्मिंग करत आहेत.
ज्या पिक आपल्या माध्यमातून खरेदी करतात. तुळशीच्या बिया आणि तेलाचा मोठा बाजार आहे.
दररोज नवीन दराने तुळशीचे बी आणि तेल विकले जाते.

Web Title : Business Idea | business idea start basil cultivation tulsi farming with low investment earn lakh rupees in 3 month

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हे देखील वाचा :

Related Posts