IMPIMP

LIC CSL ने लाँच केले Gift Card ‘शगुन’, 10,000 रुपयांपर्यंत करू शकता Shopping; जाणून घ्या

by bali123
Minimum Basic Salary-Pension | central government employees pension may increase 300 percent if supreme court allow to change formula know detail

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयडीबीआय बँकेच्या (IDBI Bank) सहकार्याने एलआयसी कार्ड्स सर्व्हिसेस लिमिटेड (LIC CSL) ने रुपे प्लॅटफॉर्म (Rupay) वर एक कॉन्टॅक्टलेस प्रीपेड (Contactless prepaid) गिफ्ट कार्ड ’शगुन’ लाँच केले आहे. या कार्डचा उद्देश गिफ्ट देण्याच्या कॅशलेस पद्धतीला प्रोत्साहन देणे आहे. एलआयसी सीएसएल कार्डद्वारे 500 रुपयांपासून 10,000 पर्यंतच्या कोणत्याही रक्कमेची भेट दिली जाऊ शकते. या कार्डने ग्राहक 3 वर्षाच्या वैधतेच्या आत अनेक व्यवहार करू शकतात. यामध्ये ग्राहक एकापेक्षा जास्त ट्रान्जक्शन करू शकतात, याचा वापर ऑनलाइन खरेदीपासून बिल भरण्यासाठी केला जाऊ शकतो, असं एलआयसी सीएसएल (LIC CSL) ने म्हटले आहे.

EPFO | नोकरी सुटल्यानंतर सुध्दा मिळेल ‘ही’ खास सुविधा, जाणून घ्या

तसेच, शगुन कार्ड, सुरूवातीच्या फेजमध्ये अधिकृत वापरासाठी एलआयसी आणि तिच्या सहायक कंपन्यांसाठी उपलब्ध असेल. कार्डचा वापर अधिकृत संमेलने आणि सोहळ्यांच्या खास पुरस्कारांच्या सुविधेसाठी केला जाईल. नंतर यास एका डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे इतर वापरासाठी सुद्धा वापरात आणले जाईल. Shagun Gift Card चा वापर भारतात लाखो मर्चंट आउटलेट्स आणि ई-कॉमर्स वेबसाइटवर कार्डवर खर्च करण्याच्या पर्यायामध्ये विविधता आणण्यासाठी केला जाऊ शकतो.

हे कार्ड वापरकर्त्यांना
डिपार्टमेंटल स्टोअर,
पेट्रोल पंम्प,
रेस्टॉरंट,
ज्वेलरी स्टोअर,
कपड्यांचे स्टोअर
इत्यादीसह विविध व्यापारी ठिकाणांवर खरेदी करण्याचे स्वातंत्र्य देईल.

ते या कार्डचा वापर करून विविध मोबाइल वॉलेट (Mobile wallet) आणि ई-कॉमर्स पोर्टल ( e-commerce portal) किंवा अ‍ॅपच्या (app) माध्यमातून ऑनलाइन खरेदी, बिलांचा भरणा, विमान, रेल्वे, बस इत्यासाठी तिकिट बुक करण्यासाठी करू शकतात, असं कंपनीने आपल्या वक्तव्यात म्हटले आहे.

Related Posts