IMPIMP

Calling Someone Bald Is Like Commenting On A Womans Breast | एखाद्याला टक्कला म्हणणे म्हणजे महिलेच्या ब्रेस्टवर टिप्पणी करण्यासारखेच, कोर्टाचा कठोर निर्णय

by Team Deccan Express
Calling Someone Bald Is Like Commenting On A Womans Breast | to call someone bald is like commenting on a womans breast Court Of The United Kingdom said

लंडन : वृत्तसंस्था – Calling Someone Bald Is Like Commenting On A Womans Breast | एखाद्याचे लहान केस पाहून तुम्हाला चिडवायची सवय असेल तर सावधान. एखाद्याच्या लहान केसांबद्दल विनोद करणे किंवा त्याला टक्कला म्हणणे यास ब्रिटनमधील न्यायालयाने (Court Of The United Kingdom) लैंगिक छळ (Sexual Harassment) मानले आहे. कोर्टाने टक्कल पडण्याची तुलना महिलेच्या स्तनांवर शेरेबाजी करण्याशी केली आहे. (Calling Someone Bald Is Like Commenting On A Womans Breast)

टक्कला शब्द वापरणे अयोग्य

टोनी फिनने तक्रार केली होती की एका घटनेदरम्यान त्याला फॅक्टरी सुपरवायझर जेमी किंग यांनी टक्कला म्हणत शिवीगाळ केली होती. यानंतर न्यायाधीश म्हणाले की, महिलांपेक्षा पुरुषांचे केस अधिक झडतात, त्यामुळे हा शब्द एखाद्यासाठी वापरणे हा भेदभावाचा प्रकार आहे. (Calling Someone Bald Is Like Commenting On A Womans Breast)

गेल्या वर्षी नोकरीवरून काढले

हे प्रकरण तेव्हा सुरू झाले जेव्हा टक्कला म्हणाल्याची तक्रार घेऊन एक कर्मचारी कोर्टात पोहोचला. टोनी फिन 24 वर्षांपासून वेस्ट यॉर्कशायरमधील ब्रिटीश बंग कंपनीत काम करत होता पण गेल्या वर्षी त्याला अचानक काढून टाकण्यात आले. यानंतर टोनी फिनने कोर्टात धाव घेतली. डेलीमेलच्या बातमीनुसार, टोनी फिनने कोर्टात अनेक दावे केले, त्यापैकी एक लैंगिक छळाचा होता.

टक्कला म्हणणे स्त्रीच्या स्तनावर भाष्य करण्यासारखे

या वादावर त्रिसदस्यीय समितीने निकाल दिला. न्यायालयाने एखाद्याला टक्कला म्हणण्याची तुलना स्त्रीच्या स्तनावरील टिप्पणीशी केली. न्यायाधीश जोनाथन बायर्न यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने आरोपांवर विचार केला की, त्याच्या टक्कलावरील टिप्पणी केवळ त्याचा अपमान होता किंवा प्रत्यक्षात छळ होता. पॅनलने म्हटले, आमच्या निर्णयात, टक्कला हा शब्द आणि सेक्सची संरक्षित वैशिष्ट्ये यांचा परस्परसंबंध आहे.

कोर्टाने म्हटले अपमानास्पद वागणूक

कोर्ट म्हणाले, आम्हाला हे लैंगिकसंबंधित वाटते.
किंगने फिनच्या रंगरूपावर ही टिप्पणी त्याला दुखावण्यासाठी केली, जी नेहमी पुरूषांमध्ये दिसून येते.
यामुळे ट्रिब्यूनलचे हे म्हणणे आहे की, फिनला टक्कला शब्द वापरणे अपमानास्पद वागणूक होती.
यामुळे फिनच्या प्रतिमेला धक्का बसला असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title :- Calling Someone Bald Is Like Commenting On A Womans Breast | to call someone bald is like commenting on a womans breast Court Of The United Kingdom said

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हे देखील वाचा :

Related Posts