IMPIMP

Car Buying Guide | नवीन गाडी खरेदी करत आहात का? ‘या’ 5 पॉईंटचा आवश्य विचार करा, अन्यथा घेतल्यानंतर करावा लागेल पश्चाताप!

by nagesh
Pune Vehicle sales | sales 63 thousand two wheelers and four wheelers and other vehicles pune six months

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Car Buying Guide | नवी गाडी खरेदी करताना कधीही घाई करू नये. कार निवडणे आणि घेण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टी असतात त्यांच्यावर विचार केला पाहिजे. अन्यथा गाडी घरी आणल्यानंतर पश्चाताप होऊ शकतो की अमूक एका गोष्टीवर मी विचारच केला नाही. कार निवडण्यासंबंधीचे (Car Buying Guide) महत्वाचे मुद्दे कोणते ते जाणून घेवूयात…

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

1. कंपनी –

गाडी कोणत्या कंपनीची घ्यायची? हा प्रश्न तुम्हाला पहिला पडला पाहिजे. इंडियन मार्केटमध्ये Maruti Suzuki, Hyundai, Tata Motors, Mahindra, Kia, Nissan, Honda, Toyota, Renault सारख्या अनेक कंपन्या आहेत, ज्यामध्ये मारुती सर्वाधिक सेल होणारी कार कंपनी आहे.

मित्र नातेवाईक आणि काही तज्ज्ञांकडून आपण माहिती घेऊ शकता. विविध कारची आणि कंपन्यांची माहिती मिळाल्याने तुम्ही योग्य निवड करू शकता. (Car Buying Guide)

2. युटीलिटी –

कंपनी निवडल्यानंतर तुम्हाला त्या गाडीची खरी युटीलिटी जाणून घ्यावी लागेल. म्हणजे तुम्ही ती कोणत्या कारणासाठी घेत आहात, जास्त कशासाठी वापरणार आहात. गाड्या अनेक सेगमेंटमध्ये येतात, ज्यामध्ये छोट्या गाड्या, हॅचबॅक, एमपीव्ही (मल्टी परपज व्हेईकल – अनेक कामांसाठी वापरता येणारे), सेडान, कॉम्पॅक्ट एसयूव्ही, मिड एसयूव्ही आणि एसयूव्ही (स्पोर्ट युटीलिटी व्हेईकल) इत्यादी असतात.

3. कुणासाठी कोणती चांगली?

हॅचबॅक – चार ते पाच लोकांच्या फॅमिलीसाठी.

एमपीव्ही – सात लोकांच्या कुटुंबासाठी.

सेडान – सामान घेऊन ये-जा करणार्‍यांसाठी.

एसयूव्ही – साहस प्रेमींसाठी, ही दुर्गम रस्त्यांवर चालवण्यास चांगली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

4. प्राईस रेंज –

पुढे हे सुद्धा महत्वाचे आहे की, तुमचे बजेट किती आहे. तुम्ही गाडीवर किती खर्च करू शकता. कार खरेदी केल्यानंतर तिच्यावर होणारा खर्च कशाप्रकारे होईल, इत्यादीवर विचार केला पाहिजे. सर्व्हिसिंग, ईएमआय इत्यादी.

5. अ‍ॅव्हरेज –

सध्या इंधनाचे दर आकाशाला भिडले आहेत. यादृष्टीने बहुतांश लोकांसाठी गाडी किती अ‍ॅव्हरेज देते, हा मुद्दा मोठा ठरतो. पेट्रोल गाड्यांच्या तुलनेत डिझेल आणि सीएनजीचा अ‍ॅव्हरेज जास्त असतो. मात्र, डिझेल गाड्यांची देखभाल पेट्रोलच्या गाडीच्या तुलनेत जास्त असते, यासाठी अनेक लोक डिझेलची गाडी खरेदी करणे योग्य मानत नाहीत.

Web Title : Car Buying Guide | car buying guide know how to choose a perfect car for yourself

हे देखील वाचा :

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 3,616 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

OBC Reservation | पंकजा मुंडेकडून फडणवीसांचे ‘कौतुक’ ! म्हणाल्या – ‘ज्या मुख्यमंत्र्यांची तुम्ही दररोज जात काढली, त्यांनीच मराठा समाजाला आरक्षण दिलं’

Swara Bhasker | ट्रोलिंगला वैतागून स्वरा भास्करने घेतला मोठा निर्णय, उचललं ‘हे’ गंभीर पाऊल

Related Posts