IMPIMP

Cause of Anxiety | जेवणात आजच या व्हिटॅमिनचा करा समावेश, चिंता आणि तणावापासून मिळेल मुक्ती

by nagesh
Cause of Anxiety | these vitamin deficiency causes anxiety and depression other health issue tips anxiety

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Cause of Anxiety | आजकाल प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या प्रकारे मानसिक तणावातून जात असतो. हा तणाव हळूहळू सुरू होतो आणि नंतर वाढू लागतो. भविष्यात तो नैराश्याचे कारण बनतो. घर, कुटुंब, ऑफिस किंवा कोणतीही वैयक्तिक समस्या, नैराश्याचे कारण असू शकते. परंतु काहीवेळा ती शरीरात जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे देखील होते (Cause of Anxiety). तणावाखाली राहणार्‍या व्यक्तीचे मानसिक आरोग्य लवकर बिघडते. कोणत्या जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे भीती, अस्वस्थता किंवा तणावाच्या समस्येचा सामना करावा लागतो, आणि आहारात कोणता बदल करून यापासून सुटका मिळवता येते, ते जाणून घेवूयात (Cause of Stress and Anxiety)…

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

1. आहारात व्हिटॅमिन B1 चा करा समावेश
व्हिटॅमिन B1 ला थायमिन असेही म्हणतात. त्याच्या अभावामुळे घाबरल्यासारखे वाटते. सोबतच डिप्रेशन, चिंता, चिडचिड आणि निद्रानाश यासारख्या अनेक मानसिक समस्या होतात. व्हिटॅमिन बी 1 चा वापर करून मेंदू ग्लुकोजचे ऊर्जेत रूपांतर करण्याचे काम करतो. त्याच्या कमतरतेमुळे थकवा आणि भूक देखील कमी होऊ शकते. आहारात व्हिटॅमिन बी1 चे प्रमाण वाढवून तुम्ही या समस्यांपासून मुक्त होऊ शकता. (Cause of Anxiety)

2. व्हिटॅमिन डी करते स्नायूंचा विकास
व्हिटॅमिन डी हाडे आणि स्नायूंच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावते. त्याच्या कमतरतेचा मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतो आणि त्यामुळे नैराश्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे चिंता निर्माण होते. आहारात व्हिटॅमिन डीचे प्रमाण वाढवल्यास तणाव, घाबरणे किंवा अस्वस्थता या समस्यांमध्ये आराम मिळतो.

3. व्हिटॅमिन बी मुळे चिडचिड होईल दूर
चिडचिड होत असेल किंवा थकवा जाणवत असेल तर शरीरात व्हिटॅमिन बी ची कमतरता आहे हे समजून घ्या.
व्हिटॅमिन बीच्या कमतरतेमुळे मूड खराब होतो. व्हिटॅमिन बी चे प्रमाण वाढवून चिडचिडेपणाची समस्या कमी करता येते.
मानसिक आरोग्यासाठी व्हिटॅमिन बी6, बी12 आणि बी9 देखील आहारात समाविष्ट करू शकता.
यासोबतच अन्नामध्ये लोह, आयोडीन, मॅग्नेशियम आणि ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड्स भरपूर प्रमाणात घेणे चांगले असते.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Web Title :- Cause of Anxiety | these vitamin deficiency causes anxiety and depression other health issue tips anxiety

हे देखील वाचा :

Keshav Upadhye | ‘त्यांची नजरही आता भ्रष्ट झाल्यामुळे गिधाड आणि गरुड यांच्यातला फरक कळत नाहीे, अमित शाह हे…’

Thane ACB Trap | मासिक हप्ता 20 हजार रुपये घेताना पोलीस नाईक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Devendra Fadnavis | उद्धव ठाकरेंच्या आरोपांना देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर; म्हणाले – ‘हिंमत होती तर…’ (व्हिडिओ)

Related Posts