IMPIMP

Chandarashekhar Bawankule-Uddhav Thackeray | चंद्रशेखर बावनकुळेंनी धरलं उध्दव ठाकरेंनाच जबाबदार, म्हणाले – ‘प्रकल्प त्यांच्यामुळेच…’

by nagesh
Chandrashekhar Bawankule | 'Our clan is Hindutva, you are your clan..', Uddhav Thackeray's 'that' criticism of Bavan clans' counterattack (Video)

कोल्हापूर : सरकारसत्ता ऑनलाईन  – Chandarashekhar Bawankule-Uddhav Thackeray | वेदांता-फॉक्सकॉन (Vedanta Foxconn) आणि टाटा-एअरबस (Tata-Airbus) सारखे मोठे प्रकल्प गुजरातला (Gujrat) गेल्यानंतर आधीच अडचणीत असलेले शिंदे-फडणवीस सरकार ( Shinde-Fadnavis Government) केंद्राकडून ऊर्जा उपकरण निर्मिती झोन मिळविण्याच्या आठ राज्यांच्या स्पर्धेत महाराष्ट्र (Eknath Shinde Government) मागे पडला आहे. त्यामुळे अजून अडचणीत आले आहे. पण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) मात्र या अपयशाचे खापर उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackarey) महाविकास आघाडीवर (MVA Govt) फोडत आहेत. (Chandarashekhar Bawankule-Uddhav Thackeray)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘तिन्हीही प्रकल्प गेले, कारण महाविकास आघाडीने काहीच निर्णय घेतले नाही. मुख्यमंत्री कोरोनाने घाबरून 18 महिने मंत्रालयात गेले नाहीत. त्यामुळे लाखो रुपये गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविणाऱ्या उद्योजकांला मुख्यमंत्री ठाकरे ५-५ तास भेटत नव्हते, मग काय होईल? या सर्व प्रकल्पांसाठी प्रस्ताव वेळेत दाखल केले नाहीत. हा महाविकास आघाडी सरकारचा दोष आहे. पण यापुढे असे होणार नाही, कारण या सरकारला सहज भेटता येते’. (Chandarashekhar Bawankule-Uddhav Thackeray)

याच वेळी बावनकुळेंनी महाविकास (Mahavikas Aghadi) आघाडीतील सर्वांवर जोरदार हल्ला केला.
उद्धव ठाकरे फक्त काँग्रेसचे संविधान स्वीकारायचे राहिले होते. राष्ट्रवादीने महाविकास आघाडी सरकार हायजॅक केले
होते. अगदी काँग्रेसचे (Congress) कार्यकर्तेही यामुळे अस्वस्थ झाले होते. काँग्रेस-राष्ट्रवादीचे (NCP)
नेते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत त्यामुळे लवकरच भाजपमध्ये पक्षप्रवेशाचा बॉम्ब फुटणार आहे, असा दावा ही त्यांनी केला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Chandarashekhar Bawankule-Uddhav Thackeray | chandarashekhar bawankule criticizes uddhav thackeray over his decisions

हे देखील वाचा :

NCP MLA Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाड यांच्यासह 12 जणांना जामीन मंजूर; जाणून घ्या कोर्टात काय-काय झालं

President Draupadi Murmu | पश्चिम बंगालच्या मंत्र्यांचे राष्ट्रपती विरोधात वादग्रस्त विधान; म्हणाले – ‘आपल्या राष्ट्रपती कशा दिसतात?’

Pune Pimpri Crime | पनवेल महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणाला लाखोंचा गंडा, 3 जणांना अटक

Related Posts