IMPIMP

Chandrakant Patil | ‘संजय राऊत घाण, त्यांच्यामुळे 50 लोक पक्षातून निघून गेले’ – आ. चंद्रकांत पाटील

by nagesh
Chandrakant Patil | 50 mlas left shiv sena because of sanjay raut says mla chandrakant patil

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – शिवसेनेतील बंडाला आता 5 महिने पूर्ण होतील. तरीदेखील शिवसेना (ठाकरे गट) आणि बाळासाहेबांची शिवसेना
(शिंदे गट) यांच्यामधून विस्तव जात नाही. पुन्हा पुन्हा बंडाच्या आणि बंडखोरांच्या गोष्टी दोन्ही गटांत सुरू असतात. शिवसेना खासदार संजय राऊत तर
एकही दिवस बंडखोरांवर टीका केल्याशिवाय राहत नाहीत. संजय राऊत यांच्या टीकेला शिंदे गटाच्या आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)
यांनी उत्तर दिले आहे. संजय राऊत मोठी घाण आहे आणि याच घाणीमुळे शिवसेनेतून 50 लोक गेले, असे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

सीमावादाचा प्रश्न सोडविण्यासाठी शिंदे सरकार आणि त्यांचा गट कामाख्या देवीला नवस करणार का, असे संजय राऊत यांनी विचारले होते. त्याच्यावर चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नुसते तोंड चालवून काही होत नाही. कधी कुणाला चांगले म्हणायचे, कधी कुणाला वाईट म्हणायचे, चाळीस रेडे म्हणायचे. घाण करणारा जमिनीवरचा प्राणी कोण आहे? तुम्ही जी घाण केली, या घाणीच्या साम्राज्यामुळे 50 लोक तिकडे गेले. घाणीचे साम्राज्य निर्माण करणारा जो प्राणी आहे, तो म्हणजे संजय राऊत आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

सीमावादाचा प्रश्न सोडविण्याची ताकद आमच्या हातात आहे. त्यासाठी युतीचे सरकार सक्षम आहे.
प्रत्येक निवडणुकीवेळी आम्ही देवीचा आशीर्वाद घेतो. त्यामुळे विशिष्ट कामासाठी आशीर्वाद घेतले पाहिजेत,
असे काही नाही. भाजप आणि शिंदे सरकारच्या माध्यमातून कर्नाटकातील मराठी बांधवांना नक्की न्याय मिळेल.
संजय राऊत अजून तिकडे गेलेच नाहीत. आणि आधीच म्हणतात माझ्यावर हल्ला होणार आहे.
त्यांचे हे विधान म्हणजे प्रसिद्धीसाठी केलेले विधान आहे. त्यांना प्रसिद्धी मिळवायची आहे.
त्यांच्यावर हल्ला करायला ते स्वतःला आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्त्व समजतात का? ,
असे यावेळी आमदार पाटील यांनी नमूद केले.

Web Title :- Chandrakant Patil | 50 mlas left shiv sena because of sanjay raut says mla chandrakant patil

हे देखील वाचा :

Ahmednagar ACB Trap | नवीन मीटर बसवण्यासाठी लाच मागणारा वायरमन अटकेत; राजुरी तालुक्यातील प्रकार

Pune PMC News | जी-२० परिषदेसाठी पुणे महापालिकेची लगबग ! शहर सुशोभिकरणासाठी उद्योजक, बँकांची मदत घेणार – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त

Pune Pimpri Crime | लग्नाच्या आमिषाने महिलेवर लैंगिक अत्याचार, भोसरी परिसरातील प्रकार

Related Posts