IMPIMP

Chandrakant Patil | एसटी कामगारांच्या विलिनीकरणावरुन चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले – ‘नाही दे जा असं म्हणून…’

by bali123
Chandrakant Patil | chandrakant patil targets rohit pawar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Chandrakant Patil | राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून विलिनीकरणाच्या मागणीवरुन एसटी कामगारांचा संप (ST Workers Strike) सुरु आहे. एसटी कामगार विलिनीकरणावर ठाम आहेत. दरम्यान विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान (Maharashtra Winter Session) विलिनीकरणाच्या मुद्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शुक्रवारी स्पष्टोक्ती दिली. ‘विलिनीकरणाचा विषय एसटी कर्मचाऱ्यांनी डोक्यातून काढून टाकावा,’ असं स्पष्टीकरण पवार यांनी यावेळी दिले. यानंतर आता भाजपाचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

विलिनीकरणाच्या मुद्यावरुन बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘एसटी कर्मचाऱ्यांचे विलिनीकरण करण्यात अडचण काय आहे. राज्याची तिजोरी आहे कशासाठी हे मला कळतचं नाही. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी खूप काटेकोरपणे राज्य चालवल्याने 15 कोटींच्या वर आपल्याला कर्ज घ्यावे लागणार नाही. कोविड मध्ये मोदींनी 5 टक्के आणखी वाढवून दिले आहेत. सभागृहामध्ये एसटीच्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ देता येत नाही असे सांगितले. मग त्या तिजोरीचे करायचे काय? ‘नाही दे जा’ असं म्हणून चालत नाही.’ असं पाटील (Chandrakant Patil) म्हणाले.

काय म्हणाले आहेत अजित पवार?

एसटी कामगारांच्या विलिनीकरणाच्या मागणीचा चेंडू उच्च न्यायालयात (Mumbai High Court) आहे.
न्यायालयाच्या निर्देशावरुन विलिनीकरणाची शक्यता तपासण्यासाठी एक समिती स्थापन झालेली आहे.
त्या समितीने आपला अभ्यास सुरु केलेला आहे, त्या समितीने अभ्यासासाठी मुदत वाढ मागितली असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.
तसेच, समितीचा अहवाल येईल तेव्हा येईल पण एसटी कामगाराचं शासनात विलिनीकरण शक्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Web Title :- Chandrakant Patil | bjp chandrakant patil reaction to the merger of st employees MSRTC

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

हे देखील वाचा :

Related Posts