IMPIMP

Chandrakant Patil | ‘शाळा सुरू करण्यासाठी फुले-शाहू-आंबेडकरांनी भीक मागितली’; चंद्रकांत पाटलांचे वादग्रस्त विधान

by nagesh
Chinchwad Bypoll | pimpri chinchwad bypoll election who will bjp candidate chandrakant patil gave hint

पैठण : सरकारसत्ता ऑनलाईन – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) शुक्रवारी पैठण येथे एका आयोजित कार्यक्रमाला
आले होते. यावेळी त्यांनी भाषण केले आणि विविध मुद्यांना हात घातला. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले. कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ.
बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी बहुजानांसाठी शाळा सुरू केल्या. त्यावेळी त्यांनी शाळा सुरू करण्यासाठी भीक मागितली होती.

पैठणमधल्या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी शाळांना देण्यात येणाऱ्या अनुदानावरून महापुरुषांचा दाखला देत असताना हे वक्तव्य केले आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिराव फुले यांनीही शाळा सुरू केल्या. त्यांना शाळा सुरू करण्यासाठी सरकारने अनुदान दिले नाही, तर त्यांनी लोकांकडे भीक मागितली. तेव्हाच्या काळात लोक 10 रुपये देत होते. आता 10 – 10 कोटी रुपये देणारे लोक आहेत. (Chandrakant Patil)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

चंद्रकांत पाटलांच्या ‘भीक मागितली’ या शब्दावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी पाटलांवर टीका केली आहे. भाजपमध्ये वाचाळवीर आहेत, हे चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले. कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकवर्गणी आणि लोकसहभागातून शाळा उभारल्या होत्या. स्वत:जवळील पैसेही या महापुरुषांनी शाळांसाठी खर्च केले. त्यांनी भीक मागितली नव्हती. भीक म्हणून तीनही महापुरुषांचा अपमान चंद्रकांत पाटील यांनी केला आहे, असे अमोल मिटकरी यांनी नमूद केले.

Web Title :- Chandrakant Patil | bjp leader chandrakant patil statement on mahatma phule dr babasaheb ambedkar and karmveer bhaurao patil

हे देखील वाचा :

MNS Leader Vasant More | “जिथे फुले वेचली तिथे काटे …”; वसंत मोरेंचा शहर कार्यालयात येण्यास नकार

Inter Caste Marriage | आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना आता पोलीस पुरवणार सुरक्षा

SSC HSC Board Exams | दहावी, बारावीच्या परीक्षार्थींनो सावधान; बोर्डाने बदलले हे दोन नियम

Maharashtra Police Inspector to ACP Promotion | राज्यातील 32 पोलीस निरीक्षक सहायक पोलीस आयुक्त पदाच्या पदोन्नतीच्या कक्षेत; पुणे शहरातील 2, पुणे ग्रामीणमधील 2 आणि अ‍ॅन्टी करप्शनमधील एका अधिकार्‍याचा समावेश, वाचा संपुर्ण यादी

Related Posts