IMPIMP

Chandrakant Patil | ‘देवेंद्र फडणवीस हे वेगळंच रसायन; त्यांच्या डोक्यात…’ – चंद्रकांत पाटील

by nagesh
 Pune Kasba Bypoll Election | kasaba peth assembly bypoll who will become congress candidate 16 name in race

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  Chandrakant Patil | मागील पंधरा दिवसापासून राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya Sabha Elections) पार्श्वभूमीवर राज्यात वातावरण चांगलंच तापलं असल्याचं पाहायला मिळालं. यादरम्यान महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) आणि भाजप (BJP) यांच्यात आरोपांच्या फैरी झडत होत्या. आमचे चारही उमेदवार निवडून येतील असा दावा आघाडी सरकार करत होतं. तर आमचे तिन्ही उमेदवार निवडून येतील असा दावा भाजपकडून केला जात होता. अखेर हा भाजपचा दावा खरा ठरला आहे. भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून येत सहाव्या जागेवरचा उमेदवार निवडून आणण्यात यश आलं आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे या निवडणुकीतील किंगमेकर ठरले आहेत. यावरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मोठं विधान केलं आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

माध्यमांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, “देवेंद्र फडणवीस हे एक वेगळंच रसायन आहे. त्यांच्या डोक्यात काय चाललंय हे आमच्यासारख्या सहकारी कार्यकर्त्यालाही कळणं अवघड आहे, असं विधान त्यांनी केलं आहे. त्यावेळी बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्रात गेल्या 24-25 वर्षात राज्यसभेची निवडणूक झाली नव्हती. मात्र, आमचा स्वभाव असा आहे की, आम्ही देवेंद्र फडणवीस सांगतील त्याच्यावर विश्वास ठेऊन ते सांगतील तेवढं काम करतो. देवेंद्र फडणवीस यांनी डोक्यातला प्लॅन अचूकपणे इम्पिमेंट करुन 6 वी सीट काढली,” असं पाटील म्हणाले.

संजय राऊतांवर टीका –
“संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यापेक्षा धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांना अर्ध मत तरी जास्त मिळायला पाहिजे, हे देवेंद्र फडणवीस यांचे उद्दिष्ट होते. हे उद्दिष्ट पूर्ण झाले. धनंजय महाडिक यांना 41.56 मतं मिळाली. तर संजय राऊत यांना 41 मतं मिळाली, ते राज्यसभा निवडणुकीत 6 व्या क्रमांकावर फेकले गेले,” असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे.

पुढे चंद्रकांत पाटील म्हणाले, “महाविकास आघाडीची अवस्था ‘नाचता येईना अंगण वाकडे’ अशी झाले आहे.
मला कोणाचं समर्थन करायचं नाही, पण महाराष्ट्रात सत्तेचा किती दुरुपयोग सुरु आहे.
एका अभिनेत्रीला एकीकडून सुटली की दुसऱ्या पोलीस स्टेशनला फिरवले जात आहे. ‘थोबाडीत लगावली असती’,
हे वाक्य उच्चारले म्हणून केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना अटक होते.
हा सत्तेचा दुरुपयोग नाही का?” असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पक्षासाठी बायकोचंही ऐकणार नाही…
“आम्ही संजय पवार यांना हरवलेले नाही. संजय पवार हा माझ्या घरातला मुलगा आहे. त्यामुळे त्यांच्या पराभवाने मला दु:ख झाले.
पण शेवटी मला माझी पार्टी महत्त्वाची आहे. पार्टीसाठी मी माझ्या बायकोचंही ऐकत नाही.
उद्या बायको म्हणाली, ते माझे भाऊ आहेत, तरी मी ऐकणार नाही,” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

 Web Title :- Chandrakant Patil | even i cant understand in devendra fadnavis mind says bjp chandrakant patil after rajya sabha election 2022

हे देखील वाचा :

Ravi Paranjape Passes Away | प्रसिद्ध चित्रकार रवी परांजपे यांचं 87 व्या वर्षी पुण्यात निधन

Late Period Reasons | तुम्हाला Periods उशीरा येत आहे का? जाणून घ्या याची 5 मोठी कारणे

Devendra Fadnavis | ‘राज्यसभेतील भाजपचा विजय हा लढवय्ये आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांना समर्पित’ – देवेंद्र फडणवीस

Related Posts