IMPIMP

Chandrakant Patil on Sharad Pawar | ‘शरद पवार भाजपला घाबरतात, एकटं लढण्याची हिंमत नाही’ – चंद्रकांत पाटील

by nagesh
Sharad Pawar | sharad pawar the type of backbiting is not right but sharad pawar told chandrakant patil

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Chandrakant Patil on Sharad Pawar | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ‘शरद पवार आणि महाविकास
आघाडीतील (Mahavikas Aghadi) इतर पक्ष भाजपला घाबरत असल्यामुळेच त्यांच्यात एकट्याने लढण्याची हिंमत नाही,’ असं चंद्रकांत पाटील यांनी
म्हटलं आहे. यावेळी त्यांनी मंगळवारी पुण्यात (Pune) माध्यमांशी संवाद साधला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

शरद पवार यांनी आगामी काळात महाविकास आघाडी एकत्रपणेच लढेल, यादृष्टीने नियोजन करत असल्याचे सांगितले होते. याच विषयाचा धागा पकडत चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. शरद पवार भाजपला इतके घाबरतात की, त्यामुळे एकटे – एकटे लढण्याची हिंमतच नाही. पण ते एक असतानाही त्यांची काय फ्या फ्या उडते, हे आपण कोल्हापूरमध्ये पाहिले आहे. असं पाटील म्हणाले.

पुढे चंद्रकांत पाटील म्हणाले, ”कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र असूनही त्यांना 96 हजार मते मिळाली.
तर एकटं लढूनही भाजपला 78 हजार मते मिळाली.
आणखी 9 हजार मतं तिकडूनची इकडे झाली असती तर निकाल वेगळा लागला असता.
महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना प्रत्येकी 32 हजार मतं मिळाली तर भाजपला एकट्याला 78 हजार मते मिळाली.
हाच पॅटर्न सगळ्या महाराष्ट्रात सुरु असल्याचं,” ते म्हणाले.

 

Web Title :- Chandrakant Patil on Sharad Pawar | NCP chief sharad pawar and maha vikas aghadi having fear of bjp says chandrakant patil

हे देखील वाचा :

Nana Patole on NCP | ‘राष्ट्रवादी ही काँग्रेस पक्षाच्या पाठीत सुरा खुपसतेय – नाना पटोले

7 Seater Cars Under 9 Lakh | या आहेत भारतातील सर्वात स्वस्त 7 सीटर कार, फक्त 9 लाख रुपये किंमत

Side Effects Of Eating Onion | कांदा गरजेपेक्षा जास्त खाल्ल्याने आरोग्याचं होईल नुकसान; जाणून घ्या सविस्तर

Related Posts