IMPIMP

Chandrakant Valvi | गुजरातच्या GST अधिकाऱ्याने महाबळेश्वरमध्ये खरेदी केली ६२० एकर जागा, संपूर्ण गावच विकत घेतल्याने खळबळ!

by sachinsitapure

सातारा : Chandrakant Valvi | गुजरातचे जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी (GST commissioner from Gujarat, Chandrakant Valvi) हे मुळचे महाराष्ट्रातील नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांनी सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे कांदाटी व्हॅलीमधील अख्ख्या गावासह एकूण ६२० एकर जमीन खरेदी केल्याचे उघडकीस आले आहे. जीएसटी अधिकाऱ्याचा हा प्रताप माहिती अधिकारातून समोर आला असून गुजरात समाचार या वृत्तपत्राने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

गुजरात समाचारच्या वृत्तानुसार, गुजरातच्या अहमदाबादमध्ये जीएसटीचे मुख्य आयुक्त असलेल्या वळवी यांनी कुटुंबिय आणि नातेवाईकांच्या नावावर महाबळेश्वरजवळील झाडणी नावाच्या गावासह तब्बल ६२० एकर जमीन खरेदी केली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी हे प्रकरण उघडकीस आणले.

या जीएसटी अधिकाऱ्याने गावातील सर्व नागरिकांना, तुमची जमीन सरकारकडून प्रकल्पासाठी अधिग्रहित केली जाणार असल्याचे सांगितले आणि जमीन खरेदी केली. ही जमीन खरेदी करताना पर्यावरण संरक्षण कायदा १९८६, वन संरक्षण कायदा १९७६ वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ सारख्या अनेक महत्त्वाच्या कायद्यांचे उल्लंघन केले आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांच्या दाव्यानुसार वळवी यांनी जमिनीतील ४० एकरांवर बेकायदेशीर रिसॉर्ट बांधले आहे. यापूर्वी चंद्रकांत वळवी भावनगर आणि गांधीनगरमध्ये कार्यरत असताना त्यांच्यावर खोटी बिले, टॅक्स क्रेडिटच्या आकड्यांमध्ये फेरफार असे गंभीर आरोप झाले होते. आता महाबळेश्वरमधील जमीन खरेदी प्रकरण उघडकीस आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Pune Divisional Flying Squad | पुणे विभागीय भरारी पथकाकडून 11 लाखाहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त

Related Posts