IMPIMP

Chandrashekhar Bawankule | ‘महाविकास आघाडीच्या लोकांनी यावर बोलूच नये!’; अजित पवारांच्या टीकेवर चंद्रशेखर बावनकुळेंचे उत्तर

by nagesh
Chandrashekhar Bawankule | bjp state president chandrashekhar bawankule on sharad pawar and ajit pawar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  – विरोधी पक्षनेता अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत विविध मुद्यांवर भाष्य केले. यावेळी अजित पवारांनी आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) प्रकरण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी, ओला दुष्काळ आणि हर हर महादेव चित्रपटावरुन सुरु असलेला वाद आदी मुद्दे चर्चिले. त्यानंतर भाजपचे प्रदेक्षाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी देखील एक पत्रकार परिषेद घेतली तेव्हा चंद्रकांत बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) सरकारवर झालेल्या सर्व आरोपांचे खंडन केले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

अजित पवारांनी महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे राज्य राहिले नाही, असा आरोप केला होता. त्यावर उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, ‘महाविकास आघाडीच्या लोकांनी यावर बोलूच नये. महाविकास आघाडीने ज्यांना गरज नव्हती त्यांना सुरक्षा दिली, अशी शेकडो उदाहरणं मी पाहिली आहेत. सर्वात जास्त आकसाने तर तुम्ही देवेंद्रजींबरोबर (Devendra Fadanvis) वागलात. केंद्र सरकार द्यायला संरक्षण द्यायला तयार झाले पण हे नाही. तुम्ही बलात्कारी, विनयभंग, दोन दोन महिलांचे प्रकरण या सर्वांचे तुम्ही समर्थन केले. तुमच्या समर्थनाचे प्रकरण काढले तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही.’ अशी टीका त्यांनी केली. ‘तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर दर ठरतात त्यामुळे मी म्हणालो की त्यावर नियंत्रण ठेवणे कठीण आहे. काही झाले की दर वाढले की केंद्र सरकार करते. असे म्हटले जाते,’ असेही ते म्हणाले.

‘मुख्यमंत्र्यांच्या खाजगी सहाय्यकांना मुख्यमंत्रांला भेटण्यासाठी चार चार तास ताटकळत राहावे लागत होते.
अडीच वर्षात त्यांनी एका तरी आमदाराच्या पत्रावर तरी सही केली का?’ असा प्रश्नही त्यांनी केला.
‘त्यांच्याकडे रोज गळती लागली आहे. त्यांना उमेदवार ही मिळनार नाही मग सरकार कसे येईल.
जिथे आमदार तिथे पक्ष, असे हे लोक आहेत. सत्ता गेल्यामुळे ते खूप अस्वस्थ आहे.
त्यांनी आपल्या सरकारवर बोलावे. अजित दादा अस्वस्थतेत बोलतात,’ अशी जोरदार टीकाही त्यांनी केली.

राष्ट्रवादीतील अंतर्गत राजकारणाबद्दल बोलताना बावनकुळे म्हणाले,
‘राष्ट्रवादीत आता वाद आहेत की छोट्या पवारांनी घेतलेला निर्णय योग्य होता की, मोठे पवार
(Sharad Pawar) चुकले.’ पवारांनी उद्धवजींची बुद्धी भ्रष्ट केली अनं चुकीचे सरकार आले,
अशी थेट टीकाही त्यांनी केली. तसेच, ‘जितेंद्र आव्हाडांचे समर्थन करणे म्हणजे महाराष्ट्रातील महिलांचा
अपमान करणे आहे.’ असेही ते म्हणाले. हे असेच होत राहिले तर आम्हाला पण विचार करावा लागेल.
रस्त्यावर उतरावे लागेल. कायदा महिलांच्या बाजूने आहे. ती महिला म्हणते की गुन्ह्याची नोंद करा.
तर गुन्हा नोंदवला पाहिजे, अशी सूचना ही त्यांनी केली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Chandrashekhar Bawankule | bjp state president chandrashekhar bawankule on sharad pawar and ajit pawar

हे देखील वाचा :

Jacqueline Fernandez | बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला जामीन मंजुर, पण पाळावी लागणार ‘ही’ अट

Ajit Pawar | “परिस्थिती अशीच राहिली तर राज्याचं चित्र गंभीर व्हायला वेळ लागणार नाही…”; अजित पवारांचा इशारा

Pimpri Traffic News | पिंपरीत कार्तिकी यात्रेनिमित्त वाहतुकीत बदल

Related Posts