IMPIMP

Chandrashekhar Bawankule | मला वाटतंय नाना पटोलेंनाच लम्पी आजार झालाय, मोदींवरील टीकेला भाजपा प्रदेशाध्यक्षांनी दिले प्रत्युत्तर

by nagesh
Chandrashekhar Bawankule | chandrashekhar bawankule criticized nana patole for statement in congress leader meeting

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Chandrashekhar Bawankule | गायींना होणारा लम्पी आजार (lumpy Skin Disease) सध्या देशात पसरला असून यामुळे मोठ्या प्रमाणात गायींना लागण होत आहे. पशुधनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने विरोधक मोदी सरकारवर (Modi Government) टीका करत आहेत. दरम्यान, काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी याबाबत म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नायजेरियातून आणणेल्या चित्त्यांमुळे लम्पी आजार पसरला आहे. मोदींवर केलेल्या या टीकेला आता भाजपा (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उत्तर दिले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, नाना पटोले मागील दोन चार महिन्यापासून ज्या पद्धतीने वक्तव्य करत आहेत, त्यातून मला असे वाटतेय की लम्पी आजार नाना पटोले यांनाच झाला असावा. त्यामुळे त्यांनाच डॉक्टरांकडे पाठवून त्यांची तपासणी करण्याची गरज आहे. नाना पटोले हे मीडियाची स्पेस मिळविण्याकरीता, राहुल गांधीच्या जवळ जाण्याकरता व तसेच आपले अध्यक्षपद टिकविण्याकरता असे वक्तव्य नेहमीच करत राहतात.

दरम्यान लम्पी आजाराबाबत नाना पटोले यांनी म्हटले होत की, लम्पी हा आजार नायजेरियातून आला आहे.
देशात चित्तेही नायजेरियातून आणले आहे. चित्त्यांच्या आणि गायींच्या अंगावर आलेले ठिपके सारखेच आहेत.
मोदी सरकारने जाणून बुजून शेतकर्‍यांचे नुकसान करण्यासाठी चित्त्यांना भारतात आणले.
महागाई, बेरोजगारी हे देशासमोरील सध्याचे सर्वात मोठे संकट आहे पण मोदी सरकारच्या काळात नोकर्‍यांची निर्मिती करण्याऐवजी आहे त्या नोकर्‍या संपवण्याचे काम केले गेले.

Web Title :- Chandrashekhar Bawankule | i think nana patole has lumpy disease bjps counterattack by chandrashekhar bawankule

हे देखील वाचा :

CM Eknath Shinde | ‘कोण कोणाबरोबर आहे हे उद्या कळेल’, दसरा मेळाव्याच्या एक दिवस आधी एकनाथ शिंदेंचे मोठं विधान

Maharashtra Political Crisis | धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यास ठाकरे गटाचा पराभव होईल? राजकीय विश्लेषकांनी मांडले मत, जाणून घ्या

Pune PMC News | ‘…तोपर्यंत पुणे महापालिकेचे स्वच्छ भारत स्पर्धेतील स्थान खालीच राहाणार विक्रम कुमार, प्रशासक आणि महापालिका आयुक्त

Pune News | 6 ऑक्टोबर रोजी ‘नैसर्गिक शेती’ कार्यशाळेचे आयोजन

Related Posts