IMPIMP

Changes In NPS | NPS नियमांमध्ये झाले 4 मोठे बदल; ई-नामांकनपासून विदड्रॉलपर्यंत का भासली ‘या’ बदलांची गरज

by nagesh
Changes In NPS | 4 major changes in nps rules from eenrollment to withdrawal request settlement why these changes were needed

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Changes In NPS | पेन्शन फंड (Pension Fund) रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) ने एनपीएसकडून शेवटचे पेमेंट घेण्याची कालमर्यादा कमी केली आहे. पीएफआरडीएचे मध्यस्थ- सेंट्रल रेकॉर्डकीपिंग एजन्सी (सीआरए), पेन्शन फंड कस्टोडियन यांनी एनपीएसच्या सिस्टम इंटरफेसमध्ये सुधारणा केली आहे. या अंतर्गत त्यांनी विविध व्यवहारांची कालमर्यादा कमी करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान क्षमता वाढवली आहे. (Changes In NPS)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

का भासली या बदलाची गरज?

हे बदल वेगाने विकसित होत असलेल्या गरजा पूर्ण करण्याच्या आणि भागधारकांना अधिक चांगला अनुभव देण्याच्या उद्देशाने करण्यात आले आहेत. या अंतर्गत, ग्राहकांची पैसे काढण्याची विनंती आता टी+4 वरून टी+2 दिवसांची केली आहे. इथे टी म्हणजे ज्या दिवशी विनंती केली त्या दिवसानंतर आणखी दोन दिवस लागतील. पूर्वी या कामाला एकूण पाच दिवस लागायचे. नियामक पीएफआरडीएने सांगितले की, सदस्यांची पैसे काढण्याची विनंती आत्तापर्यंत टी+4 कामाच्या दिवसांत निकाली काढली जात होती, जी आता टी+2 केली आहे. या बदलामुळे सीआरएशी संबंधित ग्राहकांना फायदा होणार आहे. (Changes In NPS)

नवीन व्यवस्थेअंतर्गत, प्रोटीन ईगोव्ह टेक्नॉलॉजीज सीआरएशी संबंधित विनंत्या सकाळी 10:30 पर्यंत अधिकृत असल्यास टी+2 आधारावर प्रक्रिया केली जाईल. नियामकाने सांगितले की, केफीन टेक्नॉलॉजीज लि. आणि सीएएमएस सीआरएसंबंधीत भागधारकांकडून सकाळी 11 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या विनंत्या टी+2 च्या आधारावर निकाली काढल्या जातील.

एनपीएस नियमांमध्ये झालेले 4 मोठे बदल

1. ई-नामांकन

एनपीएसमधील सरकारी आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील भागधारकांसाठी ई-नामांकन प्रक्रियेत बदल करण्यात आले आहेत. हा नवा नियम 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. आता ई-नामांकनासाठी अर्ज स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार नोडल ऑफिसरला मिळाला आहे. अर्ज केल्याच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत नोडल ऑफिसरने ई-नामांकनावर निर्णय न घेतल्यास, केंद्रीय रेकॉर्डकीपिंग सिस्टमद्वारे विनंती स्वीकारली जाईल.

2. अ‍ॅन्युइटी प्लानसाठी वेगळा फॉर्म नाही

यापूर्वी, एनपीएस सदस्यांना एनपीएस कालावधी संपल्यावर एक्झिट फॉर्म भरावा लागत होता. तसेच, लाईफ इन्शुरन्स कंपनीकडून अ‍ॅन्युइटी प्लॅन खरेदी करण्यासाठी, एक फॉर्म भरावा लागत होता. त्या आधारे पेन्शन मिळत होती. आता फॉर्म भरण्याची गरज नाही कारण एक्झिट फॉर्ममधूनच अ‍ॅन्युइटी प्लॅनसाठी अर्ज करता येणार आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

3. डिजिटल लाइफ सर्टिफिकेट सबमिशन

एनपीएसचे पेन्शनर्स आता डिजिटल लाइफ सर्टिफिकेट सादर करण्यास सक्षम असतील. हे प्रमाणपत्र आधार पडताळणीवर आधारित असेल. हे काम फेसआरडी अ‍ॅपद्वारे केले जाऊ शकते, मोबाइलमध्ये हे अ‍ॅप डाउनलोड करू शकता आणि तुमचे डिजिटल लाइफ सर्टिफिकेट बनवू शकता. हे सर्टिफिकेट वार्षिकी देणार्‍या आयुर्विमा कंपनीकडे जमा करावे लागते. हे काम आता ऑनलाइन पूर्ण करता येणार आहे. (Changes In NPS)

4. क्रेडिट कार्डद्वारे पैसे जमा नाही

एनपीएसचे टियर-2 खातेधारक यापुढे क्रेडिट कार्डद्वारे खात्यात पैसे जमा करू शकणार नाहीत.
हा नियम 3 ऑगस्ट 2022 पासून लागू झाला आहे.
या अंतर्गत क्रेडिट कार्ड पेमेंट माध्यमात ठेवून पैसे जमा करता येणार नाहीत.
मात्र, एनपीएस टियर-1 खात्यात क्रेडिट कार्ड ठेवींना अद्याप परवानगी आहे.

घरबसल्या असे उघडू शकता एनपीएस खाते

– नॅशनल पेन्शन सिस्टम ट्रस्टच्या वेबसाइटला भेट द्या https://enps.nsdl.com/eNPS/NationalPensionSystem.html.

– रजिस्ट्रेशनवर क्लिक करा आणि आधारसह नोंदणी करण्यासाठी पर्याय निवडा.

– आधार क्रमांक टाकल्यानंतर ओटीपी मिळेल. तो प्रविष्ट करून व्हेरिफाय करा.

– आता तुमची माहिती आपोआप दिसेल. इतर माहिती भरू शकता.

– आता स्कॅन केलेली स्वाक्षरी अपलोड करा. इच्छित असल्यास फोटो देखील बदलू शकता.

– पेमेंट करताच तुमचे एनपीएस खाते उघडले जाईल.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :-  Changes In NPS | 4 major changes in nps rules from eenrollment to withdrawal request settlement why these changes were needed

हे देखील वाचा :

Sanjay Raut | ‘सामना कार्यालयात संजय राऊतांना पैसे घेताना मी पाहिलंय’, मुख्य साक्षीदाराचा खळबळजनक दावा

MNS On NCP -Shivsena | मनसेची सेना-राष्ट्रवादीवर टीका, शिवसेना म्हणजे शरद पवारांच्या प्राणीसंग्रहालयातील मांजर, आधी…

Comedian Raju Srivastava Passed Away | कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे निधन, मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

Related Posts