IMPIMP

Chatrapati Shivaji Maharaj | भाजपचे ढोंगी शिवरायप्रेम; भाजप किती तोंडी नाग? सामना अग्रलेखातून टीकेचा भडीमार

by nagesh
Chatrapati Shivaji Maharaj | shivsena saamana editorial slams bjp over chhatrapati shivaji maharaj and maharashtra politics news

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – भाजप हा किती तोंडी नाग आहे? शिवाजी महाराजांचा (Chatrapati Shivaji Maharaj) अपमान करूनदेखील यांच्या धमन्या शांत आहेत. आणि जे तलवार काढून पुढे आले आहेत, त्यांना अटक केली जात आहे. असे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातून म्हटले आहे. भाजपचे शिवाजी महाराजांवरील (Chatrapati Shivaji Maharaj) प्रेम हे नवे ढोंग आहे, असे सामनातून म्हटले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी आणि पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शिवाजी महाराजांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा शिवसेनेच्या मुखपत्रातून समाचार घेण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालांपासून सर्व मंत्र्या-संत्र्यांपर्यंत प्रत्येकजण महामहोपाध्याय आणि शिवशाहीर असल्याप्रमाणे डफावर थाप मारत आहे. राधाकृष्ण विखे पाटील कधी काळी म्हराठे मावळे होते. पण, आता भाजपमध्ये जाऊन त्यांना राज्यपालांचे समर्थन करावे लागत आहे. हा मराठ्यांचा देश आहे, या कल्पनेला यामुळे धक्का बसत आहे. भाजप किती तोंडी नाग आहे, यावर संशोधन करावे लागेल, असे अग्रलेखात म्हटले आहे.

गुजरात विधानसभा प्रचारात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना शंभर तोंडी रावण म्हटले. त्याचा फायदा भाजपचे नेते काँग्रेसविरोधी प्रचारात घेत आहेत. मोदींचा अपमान काँग्रेसने केला. मोदी गुजरातचे पुत्र आहेत, त्यामुळे गुजरातची जनता त्यांना कधीच माफ करणार नाही, असे भाजप म्हणत आहे. तसेच महाराष्ट्रातील नेतेदेखील तेच म्हणत आहेत. पण, हा नियम महाराष्ट्राला लागू होऊ देत नाहीत. ज्याप्रमाणे मोदींचा अपमान हा देशाचा किंवा गुजरातचा अपमान आहे, त्याप्रमाणे शिवाजी महाराजांचा अपमान हा महाराष्ट्राचा आणि मराठी माणसांचा अपमान आहे. पण महाराष्ट्रात भाजप अपमान करणाऱ्यांना पाठीशी घालत आहे, असेही अग्रलेखात म्हटले आहे.

वेडात मराठे वीर दौडले सात चित्रपटावरून वाद झाला. त्यामुळे आता नवीन इतिहास लिहावा लागतो की काय,
असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास प्रेरणादायी आहे. त्यामुळे महाराष्ट्रात शौर्याची बीजे रोवली गेली.
स्वराज्याचा लढा साधा नव्हता. ते एक महान कार्य आणि शौर्य होते.
चारशे वर्षांनंतर त्या इतिहासावर संशोधन होऊन काय साध्य होणार आहे, असा प्रश्न सामनातून उपस्थित केला गेला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Chatrapati Shivaji Maharaj | shivsena saamana editorial slams bjp over chhatrapati shivaji maharaj and maharashtra politics news

हे देखील वाचा :

Sanjay Raut | गद्दारांना आई-बहिणीवरून शिव्या येतात; ‘मग त्या राज्यपाल आणि मंत्र्यांना द्या’ – संजय राऊत

Pune Crime | मित्र-मैत्रिणींनी चोरीचा आळ घेत तरुणीचे काढले कपडे; पुण्यातील नावाजलेल्या कॉलेजची घटना, 3 तरुणींसह 5 जणांवर FIR

Pune PMPML Accident | हडपसरमध्ये पीएमपीएमएलच्या बसचा अपघात; चालक गंभीर जखमी

Related Posts