IMPIMP

Chhagan Bhujbal | छगन भुजबळांनी शिंदे गटाला डिवचलं, म्हणाले-‘…मग आता मंत्रिपदासाठी रडता कशाला ?’

by nagesh
Chhagan Bhujbal | chhagan bhujbal s reaction on satyajit tambe s nashik election

नाशिक : सरकारसत्ता ऑनलाइन राज्यातील रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) झाल्यानंतर खातेवाटप करण्यात आले. मात्र, यानंतर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Shinde-Fadnavis Government) नाराजी नाट्य सुरु झाल्याचे पहायला मिळत आहे. भाजपकडे (BJP) महत्त्वाची खाती गेल्याने शिंदे गटात (Shinde Group) अस्वस्थता असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय शिंदे गटातील ज्या मंत्र्यांना दुय्यम दर्जाची खाती देण्यात आली आहेत तेही नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. याच मुद्यावरुन राष्ट्रवादीचे (NCP) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शिंदे गटाला डिवचलं आहे. तुम्हीच म्हणाला होतात ना आम्ही सत्तेसाठी आलो नाही. मग आता रडता कशाला ? असा टोला छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी लगावला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मंत्र्यांच्या नाराजी नाट्याच्या पार्श्वभूमीवर बोलत असताना शिंदे गटाला टोला लगावला. त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. खाते वाटप झाल्यानंतर शिंदे गटातील दादा भुसे (Dada Bhuse), दीपक केसरकर (Deepak Kesarkar) हे नाराज असल्याची चर्चा आहे. दरम्यान मिळालेल्या खात्यावर समाधानी असल्याचे सांगून आपण आजारी असल्याने कृषीमंत्री पद घेतले नसल्याचे दादा भुसे यांनी सांगितले आहे.

छगन भुजबळ म्हणाले, अखेर खाते वाटप झाले आहे हे महत्त्वाचं आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, रस्त्यांचे प्रश्न कुणाला सांगायचे हा प्रश्नच होता. अजून खूप मंत्री यायचे आहेत. त्यावेळेस खात्याचं पुन्हा वाटप होईल. जे खातं दिल आहे, त्यात काम करुन दाखवलं पाहिजे. भाजपकडे जास्त मंत्री आहेत. मुख्य वाटा जर भाजपकडे गेला असेल तर चुकीचं आहे असं म्हणता येणार नाही. शिंदे गटातील अनेकांनी सांगितलं आम्ही सत्तेसाठी आलो नाही. मग आता कशाला रडता ? असा टोला भुजबळ यांनी लगावला.

फोन उचलल्यावर ‘जय महाराष्ट्र’ म्हणेन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी फोन केला तर ते ‘जय महाराष्ट्र’ बोलतात.
मी ‘वंदे मातरम्’ म्हणणार नाही, मी जय महाराष्ट्र म्हणेन, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.
मंत्री झाल्यावर आदेश काढला, या निर्णयात वाईट वाटण्यासारखे काही नाही.
काही जण ‘जय हिंद’ बोलतात, काही जय महाराष्ट्र बोलतात,
आमचे पोलीस फोन केल्यावर जय हिंद म्हणतात, शिवसेनेचे लोक जय महाराष्ट्र म्हणतात, असेही त्यांनी सांगितले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title : –  Chhagan Bhujbal | you said you didnt come for power then why are you crying for ministership says chhagan bhujbal

हे देखील वाचा :

Abdul Sattar | शासकीय कार्यालयांमध्ये ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम’ म्हणायचं का? अब्दुल सत्तार म्हणाले…

CM Eknath Shinde | ‘विनायक मेटेंचं बलिदान वाया जाऊन देणार नाही’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

OLA Electric Car | Independence Day ला OLA चा डबल धमाका, इलेक्ट्रिक कारची घोषणा, 4 सेकंदात पकडणार 100 चा वेग

Related Posts