IMPIMP

Chinchwad Bypoll Election | राहुल कलाटेंची मनधरणी करण्यासाठी उद्धव ठाकरेंची एन्ट्री, खास व्यक्तीकडून धाडला निरोप; राहुल कलाटे अर्ज मागे घेणार?

by nagesh
Chinchwad Bypoll Election | uddhav thackeray will talk with rahul kalate to withdraw candidature from chinchwad bypoll

पिंपरी :  सरकारसत्ता ऑनलाईन – Chinchwad Bypoll Election | चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूक जाहिर झाल्यापासून अनेक राजकीय घडामोडी होताना पाहायला मिळत आहेत. कसब्यातून (Pune Kasba Peth Bypoll Election) काँग्रेस (Congress) आणि भाजपला (BJP) आपापल्या उमेदवारांची नाराजी दूर करण्यात यश मिळाले आहे. मात्र, चिंचवडमध्ये अपक्ष उमेदवार राहुल कलाटे (Rahul Kalate) यांची समजूत काढण्यात अद्याप यश आलेले नाही. दरम्यान, आपण माघार घेणार नसल्याचे सांगत निवडणूक लढवण्यावर (Chinchwad Bypoll Election) ठाम असल्याचे कलाटे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे (NCP) टेन्शन वाढले आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या माध्यमातून राहुल कलाटे यांची मनधरणी सुरु केल्याचे दिसत आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत (Chinchwad Bypoll Election) राष्ट्रवादीने नाना काटे (Nana Kate) यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीतील प्रबळ दावेदार समजले जाणारे राहुल कलाटे नाराज झाले. मागील निवडणुकीत कलाटे यांच्या मतांची टक्केवारी लक्षणीय होती. त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादीला फटका बसण्याची शक्यता आहे, असा अंदाज वर्तवला जात आहे. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी त्यांना अर्ज मागे घेण्याची विनवणी केली. मात्र राहुल कलाटे आपल्या निर्णयावर ठाम आहेत.

ठाकरे गटाचे (Thackeray Group) नेते सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना सांगितले की, राहुल कलाटे पूर्वी शिवसेनेत (Shivsena) होते. ते गटनेते राहिले आहेत. त्यामुळे त्यांनी चिंचवड पोटनिवडणुकीतून माघार घ्यावी, यासाठी आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करु. राहुल कलाटे यांचं वय पाहता त्यांचं राजकीय भविष्य चांगलं आहे. त्यांना अनेक संधी मिळू शकतात. शेवटी अपक्ष लढण्याला काही मर्यादी असतात.

मागील निवडणुकीत त्यांना चांगले मताधिक्य मिळाले होते. पण त्यावेळी कलाटे यांना राष्ट्रवादी
आणि भारिपचा पाठिंबा होता, ही गोष्ट त्यांनी ध्यानात घेतली पाहिजे.
चिंचवडमध्ये तिरंगी लढत झाली तर याचा फायदा भाजपला होईल.
त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरुन बुधवारी रात्री मी राहुल कलाटे यांची भेट घेऊन निरोप दिला.
उद्धव ठाकरे स्वत:ही त्यांच्याशी फोनवरुन बोलू शकतात. त्यांनी महाविकास आघाडीला मदत करावी हाच
आमचा प्रयत्न असल्याचे सचिन अहिर यांनी सांगितले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

उद्या पोटनिवडणुकीची उमेदवारी माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे.
त्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी सचिन अहिर यांच्या माध्यमातून राहुल कलाटे यांना खास संदेश पाठवल्याचे समजते.
आता राहुल कलाटे हे उद्धव ठाकरेंचे ऐकून निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेणार का, हे पाहावे लागेल.

Web Title :-  Chinchwad Bypoll Election | uddhav thackeray will talk with rahul kalate to withdraw candidature from chinchwad bypoll

हे देखील वाचा :

Pune Crime News | मोक्का गुन्ह्यातील आरोपीला पळून जाण्यास मदत करणाऱ्या दोन आरोपींच्या गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

Chinchwad Bypoll Election | ‘मला चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत यश पाहिजे’; अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना ठणकावले

Related Posts