IMPIMP

Chitra Wagh on Sanjay Raut | चित्रा वाघ यांचा राऊतांना सवाल; म्हणाल्या – ‘मग बाळासाहेबांनीच राज यांना हिंदुत्त्वाचे चुकीचे धडे शिकवले का ?’

by nagesh
Chitra Wagh on Sanjay Raut | shivsena leader and mp sanjay raut so did balasaheb himself teach wrong lessons of hindutva chitra waghs question to raut

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Chitra Wagh on Sanjay Raut | मशिदीवरील भोंगा (Loudspeaker) आणि हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठण या विषयावरुन राज्यातील वातावरण चांगलंच तापलं असल्याचं दिसत आहे. यावरुन मनसेनं (MNS) आक्रमक भूमिका घेत आंदोलन केलं असताना शिवसेनेकडून (Shivsena) राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) आंदोलनावर जोरदार टीका करण्यात येत आहे. राज ठाकरेंच्या आंदोलनाचा आज सर्वाधिक फटका हिंदूंना बसला असल्याचा दावा, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. यानंतर आता भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी संजय राऊत यांना सवाल केला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

भोंग्यांच्या मुद्द्यावरुन आता सत्ताधारी आणि विरोधकामध्येही राजकीय शीतयुद्ध रंगलं असल्याचं दिसत आहे. संजय राऊत यांच्या टिकेला आता चित्रा वाघ यांनी ट्विट करुन प्रत्युत्तर दिलं आहे. ”आमच्या माहितीप्रमाणे राज ठाकरेंनी हिंदुत्वाचे धडे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्याकडून गिरवले आहेत. त्यांची हिंदुत्वाची डिग्री बोगस होती, त्यांनी चुकीचे धडे शिकवले असं तुम्हाला म्हणायचं आहे का ? सर्वज्ञानी संपादकजी,” असा खोचक सवाल चित्रा वाघ यांनी राऊत यांना विचारला आहे. (Chitra Wagh on Sanjay Raut)

काय म्हणाले होते संजय राऊत ?

”भोंग्याचा वाद हा धार्मिकच असून हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न राज ठाकरे करत आहेत.
याआधी त्यांनी मराठीच्या मुद्द्यावरुन मराठी माणसांमध्ये फूट पाडली. आता ते हिंदूंमध्ये फूट पाडत आहेत.
राज ठाकरेंच्या भोंग्यामागे भाजपाचाच (BJP) हात आहे आणि आज पुन्हा एकदा भाजपाने त्यांच्या राजकारणासाठी राज ठाकरेंचा बळी दिला आहे.
राज ठाकरेंनी डोकं ठिकाणावर ठेऊन वक्तव्य करावीत, तुम्हाला हिंदुत्व शिकवणाऱ्या मास्तरांची डिग्री तपासून घ्या.
त्यांची डिग्री बोगस आहे का, ते तुम्हाला चुकीचे धडे देत आहेत,” असं संजय राऊत म्हणाले.

Web Title :- Chitra Wagh on Sanjay Raut | shivsena leader and mp sanjay raut so did balasaheb himself teach wrong lessons of hindutva chitra waghs question to raut

हे देखील वाचा :

MNS Chief Raj Thackeray | अनधिकृत मशिदींमधील भोंगे अधिकृत कसे ? राज ठाकरेंचा सवाल !

Devendra Fadnavis | ‘उद्धवजी आणि माझ्या पत्नीमध्ये एक साम्य आहे..’; देवेंद्र फडणवीस म्हणाले…

Pankaja Munde On Thackeray Government | पंकजा मुंडे यांचा ठाकरे सरकारला सवाल; म्हणाल्या – ‘अडीच वर्ष काय केलं ?’

Related Posts