IMPIMP

Cholesterol Sudden Increase | ‘या’ 6 कारणांमुळे अचानक वाढते कोलेस्ट्रॉल, जीवासाठी धोका

by nagesh
Cholesterol Sudden Increase | high blood cholesterol factors that may cause a sudden increase in cholesterol

सरकारसत्ता ऑनलाइन –  Cholesterol Sudden Increase | कोलेस्टेरॉल हा मेणासारखा पदार्थ असतो जो चरबीसारखाच असतो. आपल्या
शरीराला काही प्रमाणात कोलेस्टेरॉलची गरज असते जे सेल मेंब्रेन, व्हिटॅमिन डी (Vitamin D) तयार करण्यासाठी आवश्यक असते. शरीराला जितके
कोलेस्टेरॉल (Cholesterol) आवश्यक असते, ते लिव्हर नैसर्गिकरित्या तयार करते. मात्र, शरीरातील अनेक समस्यांमुळे रक्तातील कोलेस्टेरॉल पातळी
वाढू लागते. हाय कोलेस्टेरॉलची पातळी आरोग्यासाठी खूप धोकादायक ठरू शकते. त्याच्या वाढीमुळे हृदयविकार (Heart Disease) आणि पक्षाघाताचा धोका वाढतो. (Cholesterol Sudden Increase)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

CDC (सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन) नुसार, हा ब्लड कोलेस्ट्रॉल (Blood Cholesterol) 200 मिलीग्राम प्रति डेसीलिटर किंवा त्याहून जास्त धोकादायक मानले जाते. त्याच वेळी, हेल्दी कोलेस्टेरॉलची पातळी 200 mg/dL पेक्षा कमी असते.

उच्च कोलेस्टेरॉलची पातळी कशामुळे होते?
अमेरिकन हार्ट असोसिएशन (AHA) च्या मते, कोलेस्ट्रॉलच्या सामान्य कारणांमध्ये असंतुलित आहार, शारीरिक हालचालींचा अभाव आणि लठ्ठपणा यांचा समावेश होतो. या सर्व गोष्टींमुळे दीर्घकाळ कोलेस्टेरॉल वाढते. (Cholesterol Sudden Increase)

जर शरीरात कोलेस्टेरॉलची पातळी जास्त असेल तर डॉक्टर तुम्हाला काही गोष्टी सांगू शकतात ज्यामुळे तुमची कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊ शकते, जसे की आहार आणि खाण्याच्या सवयी बदलणे, दररोज शारीरिक हालचाली करणे, वजन नियंत्रित ठेवणे आणि धूम्रपान न करणे. अनुवांशिक कारणांमुळेही अनेक लोकांमध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असते. याला फॅमिलीअल हायपरकोलेस्टेरोलेमिया म्हणतात.

कोणत्या कारणांमुळे अचानक वाढते कोलेस्टेरॉल लेव्हल?
काही प्रकरणांमध्ये, कोलेस्टेरॉलची पातळी वेगाने वाढते. कोलेस्टेरॉलची पातळी अचानक वाढण्यामागे या गोष्टींचा समावेश होतो –

1. कॉफीचे अतिसेवन
कॉफीमध्ये कॅफिनचे प्रमाण खूप जास्त असते, त्यामुळे रक्तदाब झपाट्याने वाढतो. याशिवाय कॉफीच्या (Coffee) सेवनाने रक्तातील कोलेस्ट्रॉलही झपाट्याने वाढू लागते. 2018 मध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार, दररोज 4 अ‍ॅस्प्रेसोचे सेवन केल्याने शरीरात LDL (low-density lipoprotein) म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉलची पातळी अचानक वाढते.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

2. सायकोलॉजिकल ट्रेस –
तणाव आणि कोलेस्टेरॉलची पातळी यांच्यात घट्ट नाते आहे. मानसिक तणावामुळे शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी अचानक खूप वाढू लागते. हे कॉर्टिसॉल हार्मोनमुळे असू शकते, जे तणाव दरम्यान वाढते. 2020 च्या एका लेखानुसार, कोर्टिसोल हार्मोनच्या उच्च पातळीमुळे, शरीरातील कोलेस्टेरॉल पातळी देखील वाढते.

3. धूम्रपान (Smoking) –
धूम्रपानामुळे कोलेस्टेरॉलचे प्रमाणही वाढते. हे सिगारेटमध्ये असलेल्या निकोटीन आणि तंबाखूमुळे होते.

2021 च्या एका लेखानुसार, सिगारेट ओढताना आपल्या फुफ्फुसातून मोठ्या प्रमाणात निकोटीन रक्तात प्रवेश करते. त्यामुळे शरीरातून कॅटेकोलामाईन्स बाहेर पडतात. कॅटेकोलामाईनची पातळी वाढल्याने लिपोलिसिस किंवा लिपिड ब्रेकडाउन होते, ज्यामुळे LDL कोलेस्टेरॉलचे उत्पादन वाढते. एलडीएल कोलेस्टेरॉल वाढल्याने एचडीएल कोलेस्ट्रॉल किंवा गुड कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते.

4. औषधे (Medicines) –
काही औषधांच्या सेवनामुळे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी लक्षणीय वाढते. या औषधांमुळे शरीरातील कोलेस्टेरॉल पातळी वाढते-

रक्तदाब कमी (Blood Pressure) करणारी औषधे, बीटा ब्लॉकर्स, डॅनॅझोल, रेटिनॉइड्स, अँटीव्हायरल औषधे, अँटी सायकोटिक्स इ. सर्वसाधारणपणे, ही औषधे लिपिड चयापचय बदलून रक्तातील कोलेस्टेरॉल पातळी वाढवतात. काही औषधे, जसे की अँटीसायकोटिक्स, वजन वाढवण्यास तसेच कोलेस्टेरॉलची पातळी वाढवू शकतात.

5. प्रेग्नंसी (Pregnancy) –
प्रेग्नंसीदरम्यान, रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी 30 ते 40 टक्क्यांनी वाढते. कारण गर्भाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी कोलेस्टेरॉल अत्यंत आवश्यक आहे. मात्र, गर्भधारणेदरम्यान कोलेस्टेरॉल खूप जास्त वाढण्याची शक्यता असते. याला जेस्टेशनल हायपरकोलेस्टेरोलेमिया किंवा मॅटरनल हायपरकोलेस्टेरोलेमिया म्हणतात.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

6. जलद वजन कमी होणे
कोलेस्ट्रॉलची पातळी अचानक वाढण्यामागील एक कारण म्हणजे झपाट्याने वजन कमी (Weight Loss) होणे.
2019 च्या एका अभ्यासात, तीन प्रौढ व्यक्ती ज्यांनी खूप कमी-कॅलरी डाएटचे पालन केले त्यांचे वजन झपाट्याने कमी झाले.
या तिन्ही प्रकरणांमध्ये, त्यांचे एलडीएल कोलेस्टेरॉल सामान्य पातळीवर येण्यापूर्वी तात्पुरते वाढले. संशोधकांच्या मते, हे मेटाबॉलिज्म बदलांशी संबंधित असू शकते.

अशा परिस्थितीत, जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर हेल्थ केअर प्रोफेशनलसोबत बोलणे आवश्यक आहे
जेणेकरून तुम्हाला कोलेस्टेरॉलची पातळी अचानक वाढणे यासारख्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागू नये.

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Cholesterol Sudden Increase | high blood cholesterol factors that may cause a sudden increase in cholesterol

हे देखील वाचा :

IRCTC Dividend | इन्व्हेस्टर्सला भेट देणार आयआरसीटीसी, आता मिळेल 75 टक्के डिव्हिडंट

Supriya Sule | ‘बायको जेवढी रुसून बसत नसेल, तेवढे हे मंत्री रुसत आहेत’ – सुप्रिया सुळे

Rain Alert | राज्यात पुढील 3 तास महत्त्वाचे, मुंबई, पुण्यासह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा

Related Posts