IMPIMP

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सर्व पक्षातील आमदारांसाठी मोठी घोषणा

by nagesh
CM Eknath Shinde | uddhav thackeray is aggressive after cm eknath shinde started making phone calls to register the members of balasahebanchi shivsena

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन शिवसेनेत (Shivsena) फूट पडण्यामागचे कारण काय? असा प्रश्न जर बंडखोर आमदारांना (Rebel MLA) विचारला तर त्यांचे पहिले उत्तर येतं राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेससोबतची (Congress) युती. आणि दुसरा दावा म्हणजे मिळणारा निधी. शिवसेनेच्या आमदारांना पुरेसा निधी मिळत नसल्याचे बंडखोर आमदार सांगतात. हाच दावा महत्त्वाचा आहे. या समस्येवर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे उद्विग्नता बोलून दाखवली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सर्व पक्षातील आमदारांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी महाराष्ट्रातील सर्व आमदारांना मोठा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांकडून आमदार विकास निधीसाठी (Development Fund) तब्बल 276 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांसाठी प्रत्येक आमदाराला 80 लाखांचा निधी देण्यात येणार आहे. हा निधी जिल्ह्यातील विकासकामांसाठी वापरला जाणार आहे. सर्वपक्षीय आमदारांसाठी हा निर्णय घेतला आहे. सर्वपक्षीय आमदारांना प्रत्येकी 80 लाखांचा विकास निधी दिला जाणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाने सगळे आमदार खूश होण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे आमदारकीचा राजीनामा देणार नाहीत

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आपल्या विधान परिषदेच्या (Legislative Council) सदस्यत्वाच्या म्हणजेच आमदारकीचा राजीनामा देणार नाहीत.
विधान परीषदेत शिवसेनेचं संख्याबळ कमी होऊ नये म्हणून शिवसेना पक्ष कार्यकारिणीने (Shiv Sena Party Executive Committee) हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Web Title : –  CM Eknath Shinde | cm eknath shinde allow 80 lakh rupees fund to all mla of maharashtra

हे देखील वाचा :

Raju Srivastava Health Update | हॉस्पिटलमध्ये भरती केल्यानंतर सुद्धा आली नाही राजू श्रीवास्तवला शुद्ध, प्रकृती अतिशय चिंताजनक

Shivsena | ‘अजूनही विचार करावा, आमचे काही म्हणणे नाही’; अरविंद सावंत स्पष्टच बोलले

Pune Police Combing Operation | स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून ‘कोंबिंग ऑपरेशन’ मध्ये गुन्हेगारांची झाडाझडती, 547 सराईत गुन्हेगार गजाआड

Related Posts