IMPIMP

CM Eknath Shinde | उदयनराजे भोसलेंच्या अनुपस्थितीवर थेट बोलण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टाळले; म्हणाले…

by nagesh
Uruli Devachi-Fursungi Nagar Palika | Chief Minister Eknath Shinde did a political operation of Uruli Devachi-Fursungi! Common local citizens will have to bear the pain for the rest of their lives?

सातारा : सरकारसत्ता ऑनलाईन – सातारा जिल्ह्यातील प्रतापगडावर आज ३५३ वा शिवप्रताप दिन साजरा केला जात आहे. या कार्यक्रमाला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), शंभूराज देसाई, मंत्री मंगल प्रभात लोढा आणि आमदार शिवेंद्रसिंह राजे उपस्थित होते. मात्र,
राज्यपालांनी केलेल्या वक्त्यव्यानंतर नाराज असलेले शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले मात्र या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले. या
संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) त्यांचे मत व्यक्त केले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे दुखावले गेल्याने उदयनराजे भोसले आजच्या कार्यक्रमाला उपस्थित नाहीत. याबद्दल मुख्यमंत्र्यांना विचारणा केली असता मुख्यमंत्र्यांनी या मुद्द्यावर थेट बोलणे टाळले. “उदयनराजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. शिवप्रताप दिनाच्या निमित्ताने सर्वांनाच आनंद आहे. त्यांच्यासह सगळेच आनंदी आहेत,” अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.

उदयनराजे भोसले यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांची भूमिका
स्पष्ट केली होती. “जर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान करता येत नसेल,
तर आपण शिवाजी महाराजांचे नाव पुसून टाकू. हे बेगडी प्रेम कशाला हवे? शिवाजी महाराजांचे पुतळे, शिवजयंती, शिवप्रताप दिन कशाला हवे? हे दिवस बघण्यापेक्षा मेलो असतो तर बरे झालं असतं,” असे ते म्हणाले होते. राज्यपालांवर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी उदयनराजे भोसले दिल्लीला जाऊन पंतप्रधान आणि राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- CM Eknath Shinde | cm eknath shinde comment on udayanraje bhosale absent in shivpratap din program

हे देखील वाचा :

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डॅमेज कंट्रोल मोडवर?; प्रतापगडावर शिवप्रताप दिनानिमित्त म्हणाले – ‘जर राज्यात परिवर्तन झालं नसतं, तर…’

Pune Crime | गोळीबार झाल्याचा बनाव करुन व्यावसायिकाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी; 80 लाख रुपये खंडणी मागणाऱ्या सराईत गुन्हेगारावर गुन्हे शाखेकडून FIR

Neena Gupta | नीना गुप्तांचा वर्कआउट व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांनी केले कौतुक

Indrani Balan Winter T20 League 2022 | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; पुनित बालन ग्रुप संघाचा विजयाचा चौकार; ब्रेव्हहार्ट क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा पहिला विजय

Related Posts