IMPIMP

CM Eknath Shinde | कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद ! अखेर जत तालुक्याला मिळणार न्याय, मुख्यमंत्र्यांनी केली ‘ही’ माेठी घोषणा

by nagesh
 CM Eknath Shinde | The government will take a positive decision on the demand for salary hike of 'Umed' employees - Chief Minister Eknath Shinde

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – काही दिवसांपूर्वी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्र कर्नाटकातील सीमावाद खूप चिघळला होता. कर्नाटक सरकार सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याच्या चाळीस गावांवर दावा टाकण्याबद्दल गांभीर्याने विचार करत आहे, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले होते. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण्यांनी हा विषय चांगलाच तापवला. तसेच, त्यांच्या राजकीय पोळ्याही भाजून घेतल्या. मात्र, ज्यांच्यासाठी हा वाद झाला होता, त्यांना या वादाचा काही फायदा झाला नाही. पण, महाराष्ट्र सरकारचे लक्ष जत तालुक्यावर गेल्याचे चिन्ह दिसत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) या तालुक्यासाठी लवकर मोठी घोषणा करणार आहेत, अशी माहिती समोर येत आहे. जतमधील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी तब्बल 2 हजार कोटींचं टेंडर काढणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

सांगली जिल्ह्यातील जात तालुक्यात पाण्याची भीषण टंचाई असते, हा भाग दुष्काळी आहे. त्यामुळे तेथील ४० गावांनी महाराष्ट्र सरकारकडून होणाऱ्या दुर्लक्षाचा निषेध म्हणून कर्नाटक राज्यात (Maharashtra Karnatak Simavad) सामील होण्याचा ठराव संमत केला होता. त्याला अनेक वर्षे उलटली असली तरी कर्नाटकचे मुख्यमंत्री यांनी याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे हा विषय पुन्हा चर्चेत निघाला. या चर्चेमुळे महाराष्ट्र सरकारला जरी बराच मनस्ताप सहन करावा लागला असला, तरी या चर्चेने जत तालुक्यातील रहिवासियांसाठी सुखद बातमी आहे. सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्याला पाणी नाही, पण या वादानंतर कर्नाटक सरकारने तालुक्याच्या दुष्काळी भागात पाणी सोडले, त्यामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. कर्नाटक सरकारने जत तालुक्यातील गावांना पाणी देऊन महाराष्ट्र सरकारला एकप्रकारे आव्हान दिले. या सगळ्या घटनेनंतर तातडीने पावले उचलत जतमधील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी तब्बल 2 हजार कोटींचं टेंडर काढणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जत तालुक्यातील काही लोक भेटण्यासाठी आले होते.
तालुक्यातील लोकांच्या समस्या ऐकून घेत पुढच्या महिन्यात म्हणजे जानेवारीमध्ये पाणीप्रश्न मिटवण्यासाठी 2 हजार कोटींचे
टेंडर काढणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी या लोकांना दिले.
याअंतर्गत म्हैसाळ योजनेची व्याप्ती वाढवण्याचे काम केले जाईल. त्यातून जत तालुक्यातील ४०-५० गावांना पाणी मिळेल.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- CM Eknath Shinde | cm eknath shinde made a big announcement that jat taluka will get justice

हे देखील वाचा :

Ajit Pawar | ‘राज ठाकरेंचा आरोप धादांत बिनबुडाचा, माणसाने एवढे दुटप्पी वागू नये’ – अजित पवार

FIFA World Cup 2022 | फिफा विश्वचषक 2022 मध्ये रेफ्रीची भूमिका सांभाळणारी मारिया रेबेलो ठरली भारताची पहिली महिला

Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांचा राज ठाकरेंना सवाल, म्हणाले – ‘तुम्ही इतिहासाचा चुथडा करणार आणि दोष राष्ट्रवादीला देणार का?’

Related Posts