IMPIMP

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या शिलेदारांची घेतली भेट

by nagesh
CM Eknath Shinde | cm eknath shinde meet shivsena balasaheb thackerays co leaders liladhar dake manohar joshi

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंडखोरी करत उद्धव ठाकरे (Shiv Sena Chief Uddhav Thackeray) भूमिकेला विरोध केला. शिवसेनेतील एकनाथ शिंदे समर्थक आमदार (MLA), खासदारांनी (MP) शिवसेनेत बंड करुन खरी शिवसेना आमचीच असल्याचा दावा करत आम्ही बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे विचार पुढे घेऊन जात असल्याचे म्हटले. यानंतर आता एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे शिलेदारांची भेट घेण्यास सुरुवात केली आहे. आधी खासदार गजानन किर्तीकर (MP Gajanan Kirtikar) यांची भेट घेतल्यानंतर आता ज्येष्ठ नेते लीलाधर डाके (Senior Leaders Leeladhar Dake), मनोहर जोशी (Manohar Joshi) यांची भेट घेतली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी चेंबूर येथे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लिलाधर डाके यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमाशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, डाके यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मी सदिच्छा भेट घेतली. लिलाधर डाके यांचे पक्षाचे योगदान मी जवळून पाहिले आहे. बाळासाहेबांसोबत जे सुरुवातीला होते त्यात डाके यांचा समावेश होता. त्या काळात प्रतिकुल परिस्थितीत त्यांनी शिवसेना वाढवण्याचे काम केले. आज शिवसेनेचं जे रुप आहे त्यात डाके यांच्यासारख्या नेत्यांचे खूप मोठे योगदान आहे.

मंत्रिपद मिळूनही साधी राहणी, प्रामाणिकपणे त्यांनी काम केले. स्वत:साठी काही केले नाही.
जे केले ते शिवसेना या चार शब्दांसाठी. बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशाने त्यांनी काम केले.
अशा नेत्यांमुळे बाळासाहेबांची शिवसेना पुढे गेली. यासाठी ज्येष्ठ नेते म्हणून माझ्यासारखा कार्यकर्ता त्यांच्या भेटीला गेला, असे शिंदे यांनी सांगितले.
तसेच शिवसेनेत ज्या नेत्यांचे मोठे योगदान आहे अशा नेत्यांना भेटण्यासाठी जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेना पुढे नेण्यासाठी ज्या नेत्यांनी योगदान दिले त्यांची भेट घेऊन त्याचा अनुभव राज्यातील जनतेसाठी, सर्वसामान्यांसाठी करायचा आहे.
त्यामुळे मनोहर जोशी यांचीही भेट घेणार आहे, असंही त्यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे यांच्या भेटीमागे राजकीय चर्चाही सुरु झाल्या आहेत.
शिवसेना आणि धनुष्यबाण (Dhanushya Ban Symbol) आम्हालाच मिळावा यासाठी शिंदे गटाने निवडणूक आयोगाला (Election Commission) पत्र लिहिलं आहे.
त्यानुसार जास्तीत जास्त नेते आणि पदाधिकारी यांचा पाठिंबा मिळावा यासाठी प्रयत्न शिंदे गटाकडून केले जात आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title : –  CM Eknath Shinde | cm eknath shinde meet shivsena balasaheb thackerays co leaders liladhar dake manohar joshi

हे देखील वाचा :

दर महिन्याला रिचार्ज करण्याचे टेन्शन संपले! ‘हे’ आहेत Jio-Airtel-Vi-BSNL चे सर्वात स्वस्त प्लान जे देतात 365 दिवसांची वैधता

Pune News | डोळ्यांची काळजी घेण्यासाठी एच.व्ही. देसाई नेत्र रुग्णालयाच्या चार नवीन व्हिजन सेंटरचे उद्घाटन

Nilesh Rane | ‘धनुष्यबाण उद्धव ठाकरेंना शोभणारा नाही, लॉलीपॉप वगैरे चिन्ह देऊन टाका’, भाजप नेत्याची घणाघाती टीका

Related Posts