IMPIMP

CM Eknath Shinde | ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच माझ्यासारखी सामान्य व्यक्ती मुख्यमंत्री होऊ शकली’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महापरिनिर्वाणदिनी ग्वाही

by nagesh
CM Eknath Shinde | CM Eknath shinde said become cm only because of dr babasaheb ambedkar and indian constitution

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळेच माझ्यासारखी सामान्य कुटुंबातील व्यक्ती आज मुख्यमंत्री होऊ शकली, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस अभिवादन केले. आज (६ डिसेंबर) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुंबईतील चैत्यभूमीवर उपस्थिती दर्शवली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळेच सामान्य माणूस सर्वोच्च पदावर जाऊन देशाची सेवा करू शकतो, अशी भावना शिंदे (CM Eknath Shinde) यांनी व्यक्त केली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या इंदू मिल येथील स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण केले जाईल, असे आश्वासन एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिले. ते म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आज महापरिनिर्वाण दिनामित्त मी विनम्र अभिवादन करतो. आज आपण केवळ बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच जगामध्ये ताठ मानेने उभे आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेमुळे सर्वसामान्यांना अधिकार प्राप्त झाले. त्यांना जगण्याचा हक्क मिळाला. राज्यातही माझ्यासारखा सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती मुख्यमंत्री होऊ शकली. त्यासाठी मी डॉ. बाबासाहेबांचा शतश: ऋणी आहे. आंबेडकरांनी देशाला, समाजाला दिशा दिली. त्यांनी दुर्बलांना सशक्त करण्याचे काम केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा केंद्रबिंदू सामान्य माणूस होता. त्यांचे ध्येय मानवमुक्ती होते. त्यांनी भारतातीलच नव्हे तर जगभरातील वंचितांच्या हक्कांना, मानवी प्रतिष्ठेला वैचारिक आणि संघटनात्मक बळ दिले. दलित समाजात रुजलेली न्यूनगंडाची भावान काढून टाकली. त्यांनी संघटित होण्यास बळ दिले. शिका संघटित व्हा…., असा मूलमंत्र त्यांनी दिला.”

मुख्यमंत्री शिंदे यांनी इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक लवकरात लवकर पूर्ण होईल याची शाश्वती दिली. त्यांनी स्मारकाला भेट देऊन कामाचा आढावा घेतला. ते मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केले होते, याची ग्वाहीही दिली. तसेच बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावर आमचे सरकार चालेल असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, “डॉ. बाबासाहेब यांचे वास्तव्य असलेल्या राजगृह या वास्तूलाही मी भेट दिली. ती वास्तू ऐतिहासिक ठेवा आहे. बाबासाहेबांच्या वापरातील अनेक वस्तू, छायाचित्र, त्यांच्या अभ्यासाची खोली या सर्व ऐतिहासिक ठेव्याला जोपासले जाईल. लोअर परेल येथील स्मारकाच्या कामाचीही पाहणी केली जाईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणी जपण्याचे काम केले जाईल. आर्थिक, सामाजिक लोकशाही नसेल तर राजकीय लोकशाही यशस्वी होणार नाही, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते.”

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

त्यांनी सरकारच्या पुढच्या योजनांची ओझरती माहिती दिली.
“जोतिराव फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी चालणारे आपले महाराष्ट्र राज्य आहे.
त्यामुळे आम्ही सत्तेत आल्यावर अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले.
आम्ही शासकीय वसतिगृहांची संख्या वाढवत आहोत.
आमचा प्रयत्न आहे की, जास्तीत जास्त मुलांना शिष्यवृत्ती कशी मिळेल.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आम्ही बार्टीअंतर्गत मदत करत आहोत. हे सरकार गोरगरिबांचे आहे.
गेल्या पाच महिन्यांत कामगार, शेतकरी, गरीब, दलित, पीडित यांच्या उद्धारासाठी आपल्या सरकारने निर्णय घेतले आहेत.
राज्यभरातील लोकांकडून एक वेगळी आपुलकी, जिव्हाळा दाखवला जात आहे,” असेही शिंदे यांनी सांगितले.

Web Title :- CM Eknath Shinde | CM Eknath shinde said become cm only because of dr babasaheb ambedkar and indian constitution

हे देखील वाचा :

Pune Crime | हडपसर परिसरातील अट्टल गुन्हेगार कोल्हापूर कारागृहात स्थानबद्ध; MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांकडून आतापर्यंत 88 जणांवर कारवाई

Pune Accident News | दरी पुलाजवळ ट्रेलर उलटला; अडकलेल्या चालकाची अग्निशमन दलाकडून सुटका

Aurangabad ACB Tap | लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकासह कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Crime | 82 वर्षाच्या आईच्या सह्या घेऊन 46 लाखांची फसवणूक; मुलासह सुनेवर मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Related Posts