IMPIMP

CM Eknath Shinde | अखेर देवेंद्र फडणवीसांबद्दलचे सत्य बाहेर आले? एकनाथ शिंदेंच्या ‘या’ वक्तव्यानंतर चर्चांना उधाण

by nagesh
Maharashtra Politics | devednra fadanvis chief ministers fellowship scheme will be started again

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   साधारणपणे ५ महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) शिवसेनेत उभी फूट पाडली आणि त्यांच्या
सोबत ४० आमदार घेऊन गुवाहाटीला घेऊन गेले. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार पडले आणि महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीचे सरकार स्थापन
झाले. पण सरकार स्थापन होण्यापूर्वी बहुतेकांचा अंदाज होता की, भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील
आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहतील. झालं मात्र उलटच, शिवसेनेचे एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) झाले
आणि देवेंद्र फडणवीसांना पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे उपमुख्यमंत्र्यांचे पद स्वीकारावे लागले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मुख्यमंत्री जरी एकनाथ शिंदे असले तरी राज्यात अनेक महत्त्वाचे निर्णय देवेंद्र फडणवीस घेत असतात, हे सर्वांना माहीत आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एक प्रकारे बातमीला दुजोरा दिला आहे, स्वतः एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा ‘महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री’ असा उल्लेख केला आहे.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार पाहत आहेत. पण अनवधनाने त्यांच्या तोंडून देवेंद्र
फडणवीसांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख झाला. ते मुंबईत कोकण महोत्सवाच्या निमित्ताने बोलत होते.
त्यांच्याकडून असा उल्लेख चुकून जरी झाला असला, तरी त्यांच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण आले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- CM Eknath Shinde | cm eknath shinde sleep of tongue refers devendra fadnavis as maharashtra cm video goes viral on social media

हे देखील वाचा :

Raj Thackeray-Maharashtra Karnataka Border Issue | महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून वातावरण तापलं ! राज ठाकरेंनी दिला इशारा, म्हणाले – ‘गरज पडली तर…’

PCMC | पीसीएमसीमधील तृतीयपंथीय कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांची मुदतवाढ

LPG Gas Cylinder Charges | डिलिव्हरी बॉय ‘गॅस टाकी घरपोच’चे अतिरिक्त पैसे घेतोय, तर ही पोस्ट नक्की वाचा

Related Posts