IMPIMP

CM Eknath Shinde | ‘जर भविष्य पाहायचं असेल तर, ते ईशान्येश्वर मंदिरात जातील का?” – दीपक केसरकर

by nagesh
Deepak Kesarkar | The recruitment process of Scheduled Tribes category will be implemented in a time-bound manner, informed Deepak Kesarkar in the Legislative Council

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) सिन्नरमधील ईशान्येश्वर मंदिरात बुधवारी दर्शनाला गेले होते. त्यांनी शिर्डीला असताना पूर्वनियोजित दौऱ्यात बदल करून अचानक सिन्नरचा दौरा केला. तिथे त्यांनी कॅप्टन खरात नावाच्या व्यक्तीची भेट घेऊन त्यांचे भविष्य पाहिले अशी चर्चा होत आहे. मुख्यमंत्र्यांबरोबर (CM Eknath Shinde) त्या दौऱ्याला उपस्थित असलेले मंत्री दीपक केसरकर यांनी आता या भेटीबद्दल स्पष्टीकरण दिले आहे.

“एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) ईशान्येश्वर मंदिराच्या इथे गोशाळा व्हावी म्हणून देणगी दिली होती. त्यामुळे कॅप्टन खरात यांची मुख्यमंत्र्यांनी तिथे भेट द्यावी अशी इच्छा होती. मुख्यमंत्र्यांनी तिथे जाऊन गोशाळेचं काम सुरु होणार आहे, त्याला भेट दिली.” असे स्पष्टीकरण दीपक केसरकरांनी दिले आहे. तत्पूर्वी, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मुख्यमंत्र्यांनी असे भविष्य पाहणे गंभीर असल्याची टीका केली होती.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पुढे त्यांचे मत व्यक्त करत दीपक केसरकर म्हणाले,“आता जरी कॅप्टन खरात यांचा व्यवसाय भविष्य पाहणे असला,
तरी भविष्य विचारायला मुख्यमंत्री ईशान्येश्वर मंदिरात का जातील? भविष्य पाहायचं असतं तर त्यांनी
कॅप्टन खरात यांना मुंबईत बोलावून घेतलं असतं आणि भविष्य पाहिलं असतं. त्यामुळे काहीही बातम्या देणं हे चुकीचं आहे.” “माझी सर्वांना विनंती आहे की, शेवटी प्रत्येकाला व्यक्तिगत आयुष्य असतं. त्यात ते शिवभक्त असतील आणि त्यांनी आपल्या १० मित्रांना फोन करून देणगी द्या, म्हणत खरोखर गोशाळेसाठी काही केलं असेल तर ते गोशाळेसाठी आहे,” असे त्यांनी नमूद केले.

Web Title :- CM Eknath Shinde | deepak kesarkar comment on cm eknath shinde and astrology

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | हृदयद्रावक ! शाळेत निघालेल्या माय-लेकाच्या दुचाकीचा भीषण अपघात, आईसमोरच मुलाचा दुर्दैवी मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील घटना

Ajit Pawar | “लोकांचे लक्ष बेरोजगारी आणि महागाई पासून हटवण्यासाठी संपूर्ण वाद’ – अजित पवार

Ajit Pawar On Karnataka CM Basavaraj Bommai | कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र काय असा तसा वाटला का?; अजित पवारांचे टिकास्त्र

Related Posts