IMPIMP

CM Eknath Shinde | ‘कोण कोणाबरोबर आहे हे उद्या कळेल’, दसरा मेळाव्याच्या एक दिवस आधी एकनाथ शिंदेंचे मोठं विधान

by nagesh
Uruli Devachi-Fursungi Nagar Palika | Chief Minister Eknath Shinde did a political operation of Uruli Devachi-Fursungi! Common local citizens will have to bear the pain for the rest of their lives?

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन दसऱ्या दिवशी शिवसेनेकडून दसरा मेळाव्याचे (Dasara Melava 2022) आयोजन करण्याची परंपरा आहे. मात्र, यंदाच्या वर्षी राजकीय पार्श्वभूमी काहीशी वेगळी आहे. कारण शिवसेनेत मोठी फूट पडली असून शिवसेनेचे (Shivsena) दोन गट निर्माण झाले आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील शिवसेना असे दोन गट निर्माण झाले आहेत. उद्धव ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्क (Shivaji Park) तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा (CM Eknath Shinde) बीकेसी मैदानावर (BKC Ground) होणार आहे. या मेळाव्याच्या एक दिवस आधी शिंदेंनी मोठे विधान केले आहे. ‘कोण कोणाबरोबर आहे हे उद्या कळेल’ असं एकनाथ शिंदे म्हणाले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले, उद्याचा होणारा दसरा मेळावा हा खूप मोठा आणि भव्य स्वरुपाचा होईल. उद्या कोण कोणाबरोबर असेल ते कळेल. आम्ही दसऱ्यासाठी जनतेला गोड बातमी दिली आहे. सरकारला 100 दिवस पूर्ण झाले आहेत. तेवढ्यात साखर, चणाडाळ यासारखे पदार्थ 100 रुपयात देण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

दरम्यान, शिंदे गटाची दसरा मेळाव्याआधी एक बैठक झाली होती.
या बैठकीत मेळाव्याबाबत नियोजन करण्याविषयी चर्चा झाली होती.
या बैठकीनंतर शिंदे यांनी मोंठं विधान केलं होतं. दसरा मेळाव्यासाठी येणाऱ्या गाड्यांसाठी दहा मैदानं बूक केली आहेत.
अनेक जण आपल्यासोबत येण्यास इच्छुक आहेत, त्यामुळे अनेकांचे प्रवेश दसरा मेळाव्यात होतील, असा गौप्यस्फोट शिंदे यांनी केला होता.
त्यामुळे उद्या मेळाव्यात कोण कोणते बडे नेते शिंदे गटाच्या गळाला लागले हे समजेल.

Web Title :- CM Eknath Shinde | eknath shinde gives challenge to shivsena chief uddhav thackeray over dasara melava

हे देखील वाचा :

Maharashtra Political Crisis | धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यास ठाकरे गटाचा पराभव होईल? राजकीय विश्लेषकांनी मांडले मत, जाणून घ्या

Pune News | 6 ऑक्टोबर रोजी ‘नैसर्गिक शेती’ कार्यशाळेचे आयोजन

Police Inspector Transfer | पुणे ग्रामीण पोलीस दलातील ‘त्या’ पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी बदली

Related Posts